त्र्यंबकेश्र्वर : त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा. 
नाशिक

Nashik | त्र्यंबकेश्वरला परीक्षा हंगामातही पर्यटनाला बहर

अंजली राऊत

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होताच त्र्यंबकनगरीत शुकशुकाट असतो. मात्र, यावर्षी शनिवार, रविवार उच्चांकी गर्दी पाहायवास मिळाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील व्यावसायिक सुखावले आहेत. (Tourist season)

पर्यटनावर अवलंबून असलेले येथील व्यावसायिक या कालावधीत शुकशुकाट होत असल्याने स्वत: पर्यटनासाठी जात असायचे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत पर्यटनाच्या संकल्पना बदलल्या असल्याचे दिसत आहे. शनिवारी दोनशे रुपये दर्शनबारी मंडपाबाहेरील रांग थेट मंदिराच्या समोरील चौकात आली होती. पूर्व दरवाजा दर्शनबारीची रांगदेखील एक ते दीड किलोमीटर लांब होती. व्यावसायिकांसाठी ऑफसिझन म्हणून ओळख असलेल्या कालावधीत पर्यटनाला बहार आल्याने अनेकांची चांदी झाली आहे. तथापि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनबारीव्यतिरिक्त अन्यत्र गर्दी आढळत नाही. साहजिकच वाहनतळ ते मंदिर व सिटीलिंक बसस्थानक ते मंदिर या दोन रस्त्यांवर गर्दीचा माहौल असल्याने या परिसरात विविध व्यवसायांना चालना मिळाली आहे.

पारंपरिक फूलविक्रेत्यांची कोंडी
गर्दीत वाढ होताच दर्शनाच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट मंदिराच्या उत्तर दरवाजासमोरचे प्रांगण पोलिस बॅरिकेडिंगच्या जाळ्यांनी बंद करत आहेत. या प्रांगणात अनेक वर्षांपासून पूर्वापार परंपरेने येथील माळी समाजबांधवांची फूलविक्रीची दुकाने आहेत. बॅरिकेडिंगने हा भाग बंद केल्याने अकरा फूलविक्रेत्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT