'अल्पवयीन मुस्लिम तरुणी विवाह  
नाशिक

Nashik TCS Case Update | नाशिक टीसीएस प्रकरणी संशयितांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; कोठडी की दिलासा?

Nashik TCS Case Update | टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.११) न्यायालयात सुनावणी होणार असून, या प्रकरणातील पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.११) न्यायालयात सुनावणी होणार असून, या प्रकरणातील पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरोपींना दिलासा मिळतो की त्यांना पुन्हा कोठडीतच राहावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चेनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. यापैकी अश्विनी चेनानी सध्या कोठडीत नसून, उर्वरित चार आरोपी पोलिस कोठडीत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाकडून आरोपींवर गंभीर आरोप असल्याचे सांगितले जाण्याची शक्यता आहे, तर बचाव पक्षाकडून जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला जाणार आहे.

या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांकडून विविध पुरावे गोळा करण्यात येत आहेत. यामध्ये पीडित महिलांचे जबाब, डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी यांचा समावेश आहे. विशेष तपास पथक एसआयटी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, काही धागेदोरे परदेशी संपर्काशी संबंधित असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारच्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, यावर पुढील तपासाची दिशा व आरोपींची स्थिती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या निकालाकडे केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निदा खानची आज पुन्हा न्यायालयात हजेरी

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित शोषण मुख्य लैंगिक प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला सोमवारी (दि.११) पुन्हा नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिची पोलिस कोठडी ११ मे रोजी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून न्यायालयाकडे पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून सुरू असून, निदा खानची गेल्या काही दिवसांपासून सखोल चौकशी करण्यात येत आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते.

काही महिलांवर जबरदस्ती धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. तपास यंत्रणांकडून डिजिटल पुरावे, मोबाइल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार तसेच संशयितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. या प्रकरणाचा अजूनही सूक्ष्म तपास सुरू असून, आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणेला तिचा ताबा आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT