नांदगाव : रोजगार मेळाव्या दरम्यान युवकांना मुलाखतीस सामोरे कसे जावे याबाबत मार्गदर्शन करताना अंजुम कांदे. (छाया : सचिन बैरागी) 
नाशिक

नाशिक : नांदगावमध्ये रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

अंजली राऊत

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळावा या हेतूने नांदगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात रविवार (दि.25) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महिंद्रा अँड महिंद्रा बजाज सन्स, हिताची जळगाव, रिंग प्लस एक्वा, लुपिन फार्मासुटिकल, व्हीआयपी टपारिया टूल्स गॅब्रियल ग्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींसह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी प्लेसमेंटसाठी यावेळी उपस्थित होते. नांदगाव मतदार संघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली. रविवार (दि.25) झालेल्या रोजगार मेळाव्यात मतदारसंघातील 823 युवकांनी नोकरी करीता मुलाखत दिली. यामध्ये 417 जणांना तत्काळ नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तर काहींना पुढील इंटरव्यूसाठी नाशिक येथे बोलावण्यात आले आहे. यामध्ये दहावी-बारावी पास नापास, आयटीआय, डिप्लोमा डिग्री तसेच फार्मासिटिकल व सिव्हिल इंजिनियर यांचा समावेश होता.

मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची माहिती सोशल मीडिया व्हाॅट्सॲपवर तसेच वृत्तपत्राराद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने युवकांनी या संधीचा लाभ घेतला. अंजुम कांदे यांनी मतदारसंघातील सातवा मेळावा राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विकासाबरोबरच आमदार सुहास कांदे हे तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत देखील नेहमीच विचार करून त्यानुसार कार्य करत असल्याचे नमुद केले.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनाचे सरचिटणीस रवी देवरे यांनी मेहनत घेतली. मेळाव्याप्रसंगी नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलास आहेर, किरण कांदे, ज्ञानेश्वर कांदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे, भैय्यासाहेब पगार, संजय आहेर, नंदू पाटील, गुलाब भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, राजाभाऊ देशमुख, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी, भाऊराव बागुल, शशिकांत सोनवणे, रमेश काकळीज, बापू जाधव, उमेश मोरे, निशांत बोडके आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्या जगताप, संगीता बागुल, पूजा छाजेड, रोहिणी मोरे, तपासून शेख, विद्या कसबे, संगीता सांगळे, भारती बागोरे, सोनिया सोर, निशा चव्हाण, जयश्री डोळे आदींसह शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT