Nashik Shocking News pudhari photo
नाशिक

Nashik Shocking News: खेळताना बाल्कनीतून पडून सात वर्षांच्या मुलाचा करुण अंत

Anirudha Sankpal

Nashik Shocking News: नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील नरहरीनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चौथ्या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीतून कोसळून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कियांश प्रफुल्ल बेदाडे असं मृत मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

खेळताना अचानक तोल जाऊन कियांश थेट खाली पार्किंगमध्ये कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT