Nashik Pune Road  
नाशिक

Nashik Pune Road | नाशिक-पुणे रस्ता रुंदीकरणास 'ग्रीन सिग्ग्रल' जमीनमालकडून 'ग्रीन सिग्नल'

आयुक्त मनीषा खत्री यांची शिष्टाई : द्वारका, बिटको चौकातील वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : २०२७ मध्ये होणाऱ्या सिहरुम कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर साकारल्या जाणाऱ्या नाशिक-पुणे आठपदरी सत्याच्या भूसंपादनास जमीनमालकांकडून ग्रीन सिग्रल दिला जात असल्याने, कामांना गती मिळत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जमीनमालकांशी संवाद साधत, यशस्वी कुंभासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर, त्यास जमीनमालकांकडून प्रतिसाद दिला जात आहे. २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहर विकासाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.

सिंहस्थात लाखो भाविक, संत-महंत, पर्यटक नाशिकला येणार असल्याने, त्यांचा प्रवास सुकर सुलभ व्हावा, यासाती प्रशासनाकडून दळणवळणाच्या सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. द्वारका, बिटको चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमची सुटका करण्यासाठी नाशिक-पुणे रस्त्याच्या रुंदीकरणाचे नियोजन केले जात आहे. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनींचे भूसंपादन करण्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी जमीनमालकांच्या भेटी पेऊन, त्यांना शहराच्या विकासासाठी तसेच कुंभाच्या पशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अनेक जमीनमालकांनी आडकाठी न घेता, शहर हिताला प्राधान्य देत आपल्या जमिनी देऊ केल्याची माहिती समोर येत आहे.

टीडीआरच्या माध्यमातून आवश्यक जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सध्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने, रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळत आहे. दरम्यान, जमीनमालकांच्या सकारात्मक भूमिकेचे मनपाकडून कौतुक केले जात असून, कुंभमेळ्याच्या तयातीत प्रशासनाबरोबरच सामान्य नागरिक, जमीनमालक, व्यापारी आणि विविध संस्था सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांनी शहराच्या भविष्यासाठी दाखविलेला विश्वास आणि सहकार्य प्रेरणादायी आहे. सिंहस्थ कुंभ २०२७यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सकारात्मक तेमुळे विकासकामांना अधिक वेग मिळा असून, प्रशासन त्यांच्या प्रत्येक सहकार्याचा सन्मान राखत पारदर्शक आणि जलद कार्यवाही करेल.

- मनीषा खत्री, आयुक्त,नाशिक मनपा

टीडीआर प्रस्तावाला पाच दिवसांत मंजुरी

मौजे देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक ११३ पैकी, सिटी सर्व्हे क्रमांक ४४४/१३२ येथील जमीनमालक अनिल सुकलाल बेदमुभा व इतरांनी सादर केलेल्या टीडीआर प्रस्तावाला निशेष टीडीआर वीम्पद्वारे अवघ्या पाच दिवसांत मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याचा सन्मान राखत प्रस्तावांवर ताठदीने कार्यवाही केली असून, आणखी तीन ते चार प्रस्तावांवराणी मंजुरीची प्रक्रिया वेगाने शुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT