Ashok Kharat Case: खरातचे प्रताप! लग्नाचे अमिश, महिला राहिली गर्भवती, प्रॉपर्टी घेतली का...? न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat
Ashok Kharatpudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Case: भांदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात आज व्हीसी द्वारे सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकार्यांनी आजून ७ दिवसांची पोलीस कस्टडी द्यावी अशी मागणी केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य करत ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही पोलीस कोठडी दुसऱ्या गंभीर गुन्ह्यात सुनावण्यात आली आहे. यापूर्वी तो १४ दिवस पोलीस कोठडीत होता.

तपास अधिकाऱ्यांनी २०२४ ते २०२६ लग्नाचे अमिश दाखवून लैंगिक संबंध ठेवले होते. महिला गर्भवती राहिली होती. त्यानंतर मुलांच्या भवितव्याची भीती घातली काही गोळ्या आणि जडीबुटीचे औषध दिले होते. तसेच १२ हजार देत एका बँकेच नातेवाईकांचे आधार कार्ड घेतले होते. खरातने त्याचे काय केले. प्रॉपर्टी घेतली का काही औषध पाजले होते का त्यात काय टाकले होते याचा अजून तपास करायाचा आहे असं सांगत तपास अधिकाऱ्यांनी ७ दिवसांची पोलीस कस्टडी द्यावी अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी खरातला काही सांगायचं आहे का ? न्यायमूर्ती यांच्याकडून विचारणा करण्यात आली त्यावेळी खरातने हात जोडून नकार दिला.

Ashok Kharat
Ashok Kharat: अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; 5 नरबळींचा संशय, कोर्टात सरकारी वकिलांचा गौप्यस्फोट

तपासात सहकार्य नाही

तपास अधिकाऱ्यांनी आजच्या सुनावणीत आरोपी खरातची लैंगिक शोषण करण्याची मोरस ऑपरेंडी होती. गर्भपात करण्यासठी कुठून औषध आणायचा, महिलेच्या आई आणि वडिलांना त्याने धमकावले होते. त्यांचे आधार कार्ड पॅनकार्ड कशासाठी घेतले होते. त्याचे पुढं काय केले, आरोपी मास्टर माईंड तपासात सहकार्य करत नाही.

आरोपीने कोणते औषध वापरत होता, मंतरलेल्या पाण्यामध्ये तो काय टाकत होता हे तपासायाचे आहे. त्यासाठी तपास करायचा आहे गंभीर गुन्हा असल्यानं तपास करायचा आहे. आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Nashik Case | भोंदू खरातची कोर्टात पाच वाक्ये; म्हणाला, 'अशी मला साप, वाघ याबाबत माहिती नाही'

पोलीस कोठडी देऊ नका

दरम्यान, पहिल्या गुन्ह्यात ७ दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती. दुसऱ्या गुन्ह्यात पण तेच आहे. १४ दिवसात या गुन्ह्यात तपास झाला आहे. जबाब झाला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये ते मांडले आहे. २०२० ते २०२६ मध्ये जे घडलं ते ग्राऊंड रिपोर्टमध्ये आले आहे.

मला ग्राऊंड रिपोर्ट वाचायला मिळालेला नाही. ते सारखेच ग्राऊंड रिपोर्ट मांडत आहेत. मला एफआयआर वाचायला मिळालेला नाही. गर्भपातकरण्यासाठी कायदा आहे. त्यानुसार काही केलं आहे का, जादूटोणा कायदा लावला त्याबाबत तापास केला आहे.

याबाबतचे सर्व व्हिडिओ पब्लिक झाले आहेत. त्यानुसार बलात्कर आणि जादूटोणा केला असे कोणथ्या आधारावर आरोप केले जात आहेत. त्यांची कारणे मांडावीत दैव शक्ती होती त्याचे प्रलोभन दाखवायचा आणि मग अत्याचार करायचा असे त्यात नमूद केलं आहे. त्यानुसार पीडित महिलेचा जबाब घेतला आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नका असा युक्तीवाद आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी केला.

Ashok Kharat
Nashik Ashok Kharat Case | नाशिक हादरले! भोंदू खरात प्रकरणात दोन बड्या डॉक्टरांची चौकशी; राजकीय नेत्याच्या जावयाचे नाव चर्चेत

यावेळी सुनावणीवर न्यायमूर्ती यांनी पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये बातमी म्हणून प्रकाशित करू नका, तसे केल्यास त्याबाबत कारवाई करा असे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news