पंचवटी : प्रभाग सहामधील कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करताना सभापती रोहिणी पिंगळे. pudhari photo
नाशिक

Nashik Diwali | नवजात कन्यांच्या कुटुंबांना फराळ भेट, पंचवटी सभापती रोहिणी पिंगळे यांचा उपक्रम

Panchavati chairperson gifts Diwali faral to newborn girls- नवजात कन्यांच्या कुटुंबांना फराळ भेट पंचवटी सभापती रोहिणी पिंगळे यांचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : दीपावलीच्या सणानिमित्त पंचवटी प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे यांनी प्रभाग क्रमांक ६ आणि परिसरातील नागरिकांशी आपुलकीचे नाते जपत सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविला.

गेल्या काही महिन्यांत प्रभागातील जवळपास २०० कुटुंबांतील व्यक्तींचे निधन झाल्यामुळे यंदा दिवाळी साजरी न करणाऱ्या कुटुंबांची भेट घेत पिंगळे यांनी त्यांचे सांत्वन केले. घरात नवजात कन्येचे आगमन झालेल्या कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप केले. कुटुंबातील सदस्याच्या निधनाने दुःखातल्या अनेक घरांमध्ये यंदा दिवाळीचा सण साजरा केला जात नाही.

अशा कुटुंबांना आधार देत रोहिणी पिंगळे यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच अशा दुःखी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. सणासुदीच्या काळात या कुटुंबांना एकटेपणा जाणवू नये आणि त्यांना आपुलकीचा आधार मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

दुसरीकडे, ज्या कुटुंबांमध्ये कन्यारत्नाचे आगमन झाले आहे, त्यांच्या घरी मिठाई देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होत नवजात मुलींचे स्वागत करण्यात आले. स्त्रीजन्माचा सन्मान करण्याचा आणि कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते जपणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याची भावना रोहिणी पिंगळे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT