नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येत असलेल्या त्र्यंबक रोडच्या काँक्रिटीकरणास रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच वेद मंदिरासमोर तब्बल २५ मीटरपर्यंत तडे गेल्याचे आढळले आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गंभीर दखल घेत जेसीबीद्वारे रस्त्याचा निकृष्ट भाग काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच नव्याने रस्ता तयार केला जाईपर्यंत ठेकेदाराला प्रतिदिन १.८४ लाखांचा दंड ठोठावला आहे. च नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही स्थळांना जोडणारा त्र्यंबक रोड हा र शहरातील प्रमुख मार्ग आहे. आगामी न सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याला महत्त्व आहे. सिंहस्थ कामांतर्गत या रस्त्याचे व्हाइट टॉपिंग 5 केले जात आहे.
सद्यस्थितीत खडकाळी ते आयटीआय तसेच आयटीआय ते मनपा हद्दीपर्यंत सुरू असलेल्या या कामांतर्गत त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय न सिग्नल ते सातपूर गाव या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून, हा मार्ग लवकरच नागरिकांसाठी ड वाहतुकीस खुला होईल,
असे 5 महापालिकेतर्फे आठवडाभरापूर्वीच न जाहीर करण्यात आले होते. रस्त्याच्या गुणवत्तेच्या तपासणीत अपेक्षित किमान १८० मिमी काँक्रीट जाडीच्या तुलनेत प्रत्यक्षात १८५ मिमी जाडी आढळल्याचा तसेच या प्रकल्पात बॉन्डेड व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र, या दाव्याला आठवडाभराचा कालावधी उलटत नाही तोच वेद मंदिरासमोरील परिसरात या रस्त्याला तडे गेल्याचे आढळून आले.
याची माहिती महापालिका आयुक्त खत्री यांना समजताच त्यांनी तत्काळ स्थळपाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व शहर अभियंता संजय अग्रवाल हेदेखील यावेळी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान काँक्रीटच्या कामी पॅनलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे गेल्याचे दिसून आले. कामाची गुणवत्ता अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित भाग पुन्हा नव्याने तयार करण्याचे आदेश आयुक्त खत्री यांनी संबंधित ठेकेदाराला दिले. तसचे कामातील त्रुटींची दखल घेत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.
ठेकेदारांकडून महापालिकेला ठेंगा
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील १२३० कोटी रुपये खर्चुन २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदारांकडून होत असलेल्या रस्ते कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वारंवार समोर येत आहे. आतापर्यंत १२ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. मात्र, त्यानंतरही ठेकेदार महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
त्रिस्तरीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
सिंहस्थांतर्गत तयार केल्या जाणाऱ्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कुंभमेळा प्राधिकरण, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तसेच महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभागामार्फत या रस्ते कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवले जाते, असा दावा केला जातो.
प्रत्यक्षात रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे समोर येत असल्याने गुणवत्ता तपासणीसाठी नेमलेली त्रिस्तरीय यंत्रणा करते काय, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
विकासकामांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांच्या कररूपी पैशांचा योग्य विनियोग होणे ही महापालिकेची जबाबदारी आहे.- मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका