Municipal Corporation Commissioner Manisha Khatri | अशोक स्तंभ ते गंगापूर रोड 'मेकओव्हर'ला गती

Municipal Corporation Commissioner Manisha Khatri | पश्चिम नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
Manisha Khatri Nashik NMC Aayukt
नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री Pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशोक स्तंभते गंगापूर रोड या मार्गाच्या विकासकामांना वेग आला असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर महापालिका शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देत आहे. पश्चिम नाशिकमधील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गाचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत असून, विविध भूमिगत सुविधा उभारण्याची कामेही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत.

Manisha Khatri Nashik NMC Aayukt
Nashik |गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 66 कोटींचा प्रस्ताव

अशोक स्तंभ ते जेहान सर्कल आणि जेहान सर्कल ते गंगापूर गाव महापालिका हद्दीपर्यंत सुमारे ३.१९० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत अमृत योजनेअंतर्गत १ हजार ६७८ मीटर लांबीची सांडपाणी वाहिनी तसेच अमृत डीपीआर-२ अंतर्गत २८० मीटर सांडपाणी वाहिनीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

महापालिका बाँड प्रकल्पांतर्गत एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे १ हजार ३२० मीटर काम पूर्ण झाले असून, ऑप्टिकल फायबर केबल आणि विद्यमान विद्युत पायाभूत सुविधांचे ३ हजार ४३ मीटरपर्यंतचे कामही पूर्णत्वास गेले आहे.

Manisha Khatri Nashik NMC Aayukt
Mumbai Goa Highway Bypass: माणगाव-इंदापूर बायपासची मुदत पुन्हा हुकली! खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून बायपासला गती

दरम्यान, या मार्गावरील ३ हजार ५७२ मीटर लांबीच्या पावसाळी पाणी निचरा वाहिनीच्या (स्टॉर्म वॉटर ड्रेन) कामाला वेगाने गती देण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोड परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रस्त्याचे व पूरक सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि गतिमान होणार असून, नागरिकांना आधुनिक नागरी सुविधांचा लाभ मिळणार आहे.

- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news