winter  
नाशिक

Nashik temperature drops|थंडीचा जोर वाढला, पारा घसरला

Nashik temperature drops with Niphad recording 11.8 degrees- निफाडला नीचांकी ११.८, तर नाशिक शहरात १४ अंश सेल्सिअसची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिककरांना लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बोचरी थंडी अनुभवयास मिळाली. शहरात किमान तापमानाचा पारा १४.२ अंशांपर्यंत रविवारी (दि. ८) सकाळी साडेआठ वाजता घसरला. तसेच निफाडमध्ये सकाळी नीचांकी पारा ११.८ अंशांपर्यंत खाली आला व हवामान कोरडे राहिल्याने वातावरणात आर्द्रता ६५ टक्क्यांपर्यंत मोजण्यात आली. निफाडकरांना हुडहुडी जाणवू लागली असून, गोदावरी नदीतीरावरील परिसरात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे.

  • 7 Meta Keywords: Nashik temperature drop, Niphad lowest temperature, winter chill Nashik, weather update Maharashtra, cold wave Nashik 2026, climate news Nashik, meteorological department India

नाशिककरांना गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झाला होता. अभ्यंगस्नानासाठी नाशिककर जागे झाले असता थंडीची तीव्रताही अनुभवायला आली. पहाटे पाच ते सकाळी साडेसातपर्यंत वातावरणात गारठा अधिक जाणवला. आकाश निरभ्र राहिल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश शहरात पडल्यानंतर गारठा कमी होत गेला. 'अल निनों'च्या प्रभावामुळे यंदा उन्हाच्या झळा ऑक्टोबरच्या प्रारंभापासूनच शेवटपर्यंत अधिक तीव्रतेने नाशिककरांना जाणवल्या होत्या. नाशिककर उभ्याने घामाघूम झालेले असताना दमट हवामानापासून आता दिलासा मिळाला आहे. तूर्तास हलक्या स्वरूपाची थंडी नाशिककरांना शहरी भागात अनुभवायला येत आहे. कमाल तापमानात मात्र अद्याप फारशी घसरण झालेली नाही.

थंडीचा जोर वाढण्याची शक्यता

नाशिककरांना गुलाबी थंडी जाणवायला लागली असली, तरी थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त होत असून, नोव्हेंबरअखेरीस नीचांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अल निनोच्या प्रभावामुळे डिसेंबरमध्ये नेहमीपेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने यावर्षी अतितीव्र स्वरूपाची बोचरी थंडी जाणवण्याची शक्यता कमीच असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

नाशिककरांना गुलाबी थंडीचा आनंद

यावर्षी संपूर्ण राज्यात अल निनोचा प्रभाव दिसून येत असून, नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना थंडीचे आगमनही काही काळ उशिराने झाले आहे. त्याचप्रमाणे नेहमीच नीचांकी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उशिराने थंडीचे आगमन झाले आहे. आता हा थंडीचा मोसम किती दिवस कायम राहणार, याविषयी नाशिककरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून नाशिककर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT