नाशिक

Nashik News | वाहन जाळपोळीचे लोण मनमाडपर्यंत, मध्यरात्री जाळली दुचाकी

गणेश सोनवणे

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई, पुणे, नाशिकपाठोपाठ आता वाहन जाळपोळीचे लोण मनमाड शहरापर्यंत येऊन पोहोचले आहे. समाजकंटकांनी सोमवारी (दि. 17) मध्यरात्रीनंतर घराबाहेर उभी असलेली दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार कॉलेजजवळील डॉ. आंबेडकर चौक भागात घडला. दुचाकी जळून खाक झाली असली, तरी त्यात पेट्रोल नसल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

डॉ. आंबेडकर चौक भागात जैनुलआबेदिन शेख राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच ४१, बीएम २५६६) घराबाहेर उभी केली होती. ती अज्ञाताने रात्रीतून पेटवून दिली. गाडी जळत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी आराडाओरडा केला. सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. गाडी कोणी व का पेटवली, असा प्रश्न शेख यांना पडला आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT