पराभवाचे ‘साईड इफेक्‍ट’..! स्टिमॅक यांनी फुटबाॅल प्रशिक्षकपद गमावले

पराभवाचे ‘साईड इफेक्‍ट’..!  स्टिमॅक यांनी फुटबाॅल प्रशिक्षकपद गमावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) मुख्य प्रशिक्षक पदावरून हटविण्‍यात आले आहे. नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषकच्या पात्रता फेरीतील टीम इंडियाच्या सुमार कामगिरी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या फेरीत कुवेतविरूद्धच्या सामन्यात बरोबरी साधली होती. परंतु, त्या सामन्यात कतारविरद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचे फिफा विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले.

रविवारी बैठक घेऊन निर्णय घेतला

'एआयएफएफ'च्या अधिकाऱ्यांनी रविवारी झालेल्या बैठकीनंतर स्टिमॅक यांची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. 'एआयएफएफ'चे उपाध्यक्ष एनए हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीदरम्यान  मेनला एथेनपा (सदस्य, कार्यकारी समिती आणि अध्यक्ष, वित्त समिती), अनिलकुमार प्रभाकरन (सदस्य, कार्यकारी समिती आणि अध्यक्ष, स्पर्धा समिती), आयएम विजयन (एआयएफएफ तांत्रिक समितीचे अध्यक्ष) आणि क्लायमॅक्स लॉरेन्स (एआयएफएफ तांत्रिक समितीचे सदस्य) ) आणि सत्यनारायण (कार्यवाहक सरचिटणीस) उपस्थित होते.

करार संपुष्टात आल्याने AIFF ला शुल्क भरावे लागू शकते

तात्काळ प्रभावाने स्टिमॅक यांना पदावरुन काढून टाकणे भारतीय फुटबॉल संघटनेला मोठी किंमत मोजावी लागू शकते. ते जून 2026 पर्यंत भारतीय संघाशी करारबद्ध होते. करार संपण्याआधी स्टिमॅक यांना हकालपट्टी केल्याने AIFF ला मोठी किमत मोजावी लागू शकते

भारतीय फुटबॉलसाठी स्टिमॅक यांचे माेठे याेगदान

स्टिमॅकच्या यांना आता फुटबाॅल प्रशिक्षक पदावरुन हटविण्‍यात आलं अहे. 1998 च्या फिफा विश्वचषकात क्रेएशिया संघाचे खेळाडू म्हणून कांस्यपदक जिंकणाऱ्या स्टिमॅक यांनी 15 मे 2019 रोजी भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारली हाेती. स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चार प्रमुख विजेतेपदे पटकावली आहेत. यामध्ये दोन SAFF चॅम्पियनशिप, एक आंतरखंडीय चषक आणि त्रि-राष्ट्रीय मालिका यांचा समावेश आहे.

स्टिमॅकच्या नेतृत्वाखाली जिंकली अनेक पदके

गेल्या वर्षी, सॅफ चॅम्पियनशिप, तिरंगी मालिका आणि इंटरकॉन्टिनेंटल चषक जिंकून एका वर्षात तीन ट्रॉफी जिंकणारा ते पहिला भारतीय प्रशिक्षक बनले. मात्र, यंदाच्या एएफसी आशियाई कपमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया, सीरिया आणि उझबेकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या विश्वचषक पात्रता फेरीतील खराब कामगिरीमुळे एआयएफएफला त्याची हकालपट्टी करावी लागली.

मोठ्या बदलाच्या दिशेने AIFF

AIFF मोठे बदल आणि दीर्घकालीन यश मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच, नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीवर बारीक लक्ष असणार आहे. नवे प्रशिक्षक भारतीय फुटबॉलला पुढील स्तरावर नेण्यास मदत करतील अशी आशा चाहत्यांना आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news