नाशिक : असमान निधी वितरणासह बेकायदा भूसंपादन प्रकरणाबाबत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना जाब विचारताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | असमान निधी वितरणावरून ठाकरे गटाकडून मनपा आयुक्तांना घेराव

Land Acquisition, Nashik : असमान निधी वितरणाबाबत विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्रशासकीय राजवटीत शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्याच प्रभागातील ८० कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत असमान निधी वितरणावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना गुरूवारी (दि.१) जाब विचारला. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदेच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तब्बल तासभर आयुक्तांच्या कार्यालयाचा ताबा घेत, त्यांना घेराव घातला. दरम्यान, प्रत्येक प्रभागाला दोन कोटींचा समसमान निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. (Nashik Municipal Corporation Land Acquisition Scam)

महापालिकेत गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या असमान निधी वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा भडका अखेर उडाला. विकासकामांसाठी निधी वाटपात विरोधकांच्या प्रभागांमध्ये अन्याय केला जात असून अनेक ठिकाणी नागरिकांचा विरोध असतानाही, स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे निधी देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. इतर प्रभागांमधील करदात्या नागरिकांवर निधी वाटपात अन्याय केला जात असल्याचे सांगत, मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटीच बडगुजर, शिंदेनी आयुक्तांसमोर मांडल्या. तब्बल तासभर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनातच ठिय्या दिला.

यावेळी माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक डी. जी. सुर्यंवशी, माजी नगरसेवक संजय चव्हाण, मुशीर सय्यद, केशव पोरजे, नयना गांगुर्डे, हेमलता कांडेकर, हर्षा बडगुजर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT