नाशिक

Nashik News | वादळी पावसात बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

गणेश सोनवणे

वणी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – वणी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे.

कशी घडली दुर्घटना ?

  • संखेश्वर नगरच्या मागील भागात नांगी नाल्याजवळ आज (दि. 16) पाऊस सुरु असल्याने किशोर आंबादास भागवत (वय ५५ )मावडी ता. दिंडोरी हे बाभळीच्या झाडाखाली आडोश्याला पांघरूण घेऊन बसले होते.
  • वादळी वा-या मुळे बाभळीचे झाड त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
  • घटना घडल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डाॅ. गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस

तसेच वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे वणी पिंपळगाव रस्त्यावरील कांद्याचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर कांदे भिजल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी विजेचे खांबही पडल्याने मोठे नुकसान झाले. वणी शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक वादळीवाराने अनेकांचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. विजांचा कडकडाट जोरदार पावसाची सुरवात झाली. सकाळ पासून ढगाळ वातावरण होते परंतु उष्णता वाढलेली होती. अचानक सुरू झालेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली. बाजार पेठेत आलेल्या लोकांची धावपळ झाली. बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची तांराबळ झाली. जोरात वारा असल्याने काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. शकडो ट्रॅक्टर आलेले होते. अचानक आलेल्या कांदे झाकण्याची धावपळ तर काही भिजले. तसेच कांद्यांच्या खळ्यावरती बाधण्यात आलेले जवळपास आठ शेड हे वादळी वाऱ्यामुळे उडाल्याने शेड मधील कांदे तसेच काही वाहनांवर शेड पडल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी काद्यांच्या खळयात कांदे उघड्यावर होते. जोरात वारा व पाऊस आल्याने काही ठिकाणी कांदे भिजले. तसेच काही कार्यक्रमास मंडप देण्यात आले होते तेही पडले. अर्धा तास वादळी वारा आल्याने काही झाडाच्या फांद्यांची तुटल्या तसेच काही फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटल्या आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावरील पारेगांव फाट्या नजीक विजेचे चार ते पाच खांब पडले आहे.विज महा वितरण कंपणीचे कर्मचारी विज पुरवठा सुरळीत करत आहे.

लाखो रुपयांचे झाले नुकसान

बाजार पटांगणात लावलेले पालही उडाले. या मोकळे पटांगण असल्याने माल लढविण्यास जागा नसल्याने थोड्याफार प्रमाणात भिजला.
पिंपळगाव रोड वरील परमानंद किशोर रा. वणी यांचे काद्याची चाळीचे शेड, व कांदा एकुन १५ लाखाचे नुकसान वाघेऱ्याच्या डोंगराजवळ असेलेल्या अर्जुन राहाने रा. सुकेणे यांचे दोन शेड कोसळले असुन शेड सह काद्यांच  ४० लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांच्याच शेड खाली कांदा विक्री करण्यासाठी आलेले 5 ट्रॅक्टर, एक पिकअप, एक छोटा हत्ती, एक ट्रक यांचे ही खुप नुकसान झालेले आहे. तसेच मोहसिन मनियार यांचे शेड व कांदा ९० टन कांदा अंदाजे किमत १५ लाखाचे नुकसान विजय कुमार ठक्कर शेड उडाला असुन लाखोंचा कांदा भिजला आहे. अशोक बोरा यांच्या शेडचे पत्रे उडाले असुन त्यांचाही लाखोंचा कांदा भिजला आहे. अतुल पाटील ब्रदर्स खेडगाव ३ लाखाचा कांदा भिजला नंदुशेठ चोपडा यांचे शेडसह कांद्याचे २० लाखांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT