Nashik Panchavati dead body found in locked car:
नाशिकच्या पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह चार चाकी गाडीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बंद चारचाकीतील हा मृतदेह दोन दिवसापासून तिथं असल्यानं त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी पाहणी केली असता चारचाकी गाडीत मृतदेह सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू गुदमरून झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस आता अज्ञात इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणाचा पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केला आहे.