Nashik | चाळीसगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने अचानक घेतला पेट; चालकाने उडी मारून वाचवला जीव

Nashik | चाळीसगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने अचानक घेतला पेट; चालकाने उडी मारून वाचवला जीव
nashik truck burning news
nashik truck burning news
Published on
Updated on

नांदगाव : छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकला बेलदारवाडी घाटात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. साधारण अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास MH 20 JC 7818 क्रमांकाचा आयशर ट्रक विप्रो कंपनीचा साबण घेऊन चाळीसगावच्या दिशेने जात होता. बेलदारवाडी घाटात आल्यावर अचानक ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून खाली उडी मारली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे.

ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच नांदगाव नगरपरिषदेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.

nashik truck burning news
Manisha Jejurkar Case: मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी डॉ. स्वाती चव्हाणला अटक

मात्र या आगीत ट्रक आणि त्यातील साबणाच्या मालाचे नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग नेमकी शॉर्टसर्किटमुळेच लागली का, याचा तपास पोलीस व संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. पहाटे बेलदारवाडी घाटात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

nashik truck burning news
Nashik Sinhastha Kumbh Mela | नाशिकमध्ये सिंहस्थ ध्वजारोहण बैठकीत जोरदार गोंधळ! पंचमुखी त्र्यंबकराजाच्या मूर्तीवरून साधू-महंत आक्रमक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news