Chhagan Bhujbal Nashik | 'बाहेरच्यांना रेड कार्पेट, स्थानिकांना उद्ध्वस्त करणार का?' कुंभमेळा नियोजनावर मंत्री छगन भुजबळांचा घणाघात!

Chhagan Bhujbal Nashik | भुजबळांचा कुंभमेळा नियोजनावरून सरकारवर घणाघात!
Chhagan Bhujbal news
Chhagan Bhujbal newsPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या कुंभमेळ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे आणि ठेकेदारांचे पैसे अजूनही थकलेले आहेत. सरकार जर ३८ हजार कोटी खर्च करणार असेल, तर आधी या शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिलेच पाहिजेत. कुंभमेळ्यामुळे नाशिकचा विकास होतो याचे आम्ही स्वागत करतो, पण ही तयारी नाशिककरांच्या जिवावर बेतणारी नसावी.

Chhagan Bhujbal news
Sindhudurg|कार चालकावर हल्ला करणारे तिघेजण नाशिक येथून जेरबंद! सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा काढला माग

परकीयांसाठी रेड कार्पेट आणि स्थानिकांवर अन्याय, हे चालणार नाही, असा संतप्त सवाल करत कुंभमेळ्याच्या नियोजनावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार ताशेरे ओढले. मंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि. २०) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी नाशिकमधील विविध प्रलंबित प्रश्न, कुंभमेळ्याची तयारी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरून संवाद साधला.

मंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय दिरंगाई आणि स्थानिक प्रश्नांकडे होणाऱ्या दुर्लक्षावर बोट ठेवत थेट सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. "बाहेरच्या लोकांसाठी रेड कार्पेट अंथरायचे आणि स्थानिक नाशिककरांना नष्ट करायचे का?" असा सवाल उपस्थित केला. तसेच कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, "राष्ट्रपती येण्यापूर्वी प्रत्यक्ष कामे पूर्ण करा, ते इथे काय अर्धवट कामे बघायला येतील का?" असा चिमटा काढला. कुंभमेळा बैठकांमधील गोंधळावर तोडगा काढण्यासाठी साधू-संतांच्या प्रतिनिधींना सोबत घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.

...अन्यथा नाशिकचे नाव खराब होईल!

त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात पर्यटकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत मंत्री भुजबळ म्हणाले, "नाशिक हे पर्यटनाचे केंद्र आहे, अनेक लोकांनी इथे सेकंड होम बनवले आहे. अशा मारहाणीच्या घटना प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या तर नाशिकचे नाव खराब होईल आणि पर्यटक येणे बंद होईल.

पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर टीका करताना त्यांनी आठवण करून दिली, मी गृहमंत्री असताना पोलिसांची संख्या कमी असतानाही प्रभावी गस्त (पेट्रोलिंग) ठेवली जायची. आज समृद्धी महामार्गावर दरोडे पडत आहेत, ही गंभीर बाब असून, पोलिसांनी तत्काळ यावर कडक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

Chhagan Bhujbal news
Sindhudurg Crime : कार चालकावर हल्ला करणारे तिघेजण नाशिक येथून जेरबंद!

'अधिकारी अन् गुन्हेगारांवर कारवाई करा'

नाशिकमधील खड्ड्यांमुळे शहराची बदनामी होत असल्याचा आरोप करत मंत्री भुजबळ यांनी रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरात ५० झाडांची बेकायदेशीर कत्तल झाल्याच्या प्रकारावर त्यांनी संताप व्यक्त केला.

महानगरपालिकेचे काही अधिकारी अशा लोकांना सांभाळतात, म्हणूनच हे माफिया डोक्यावर बसले आहेत. केवळ झाडे कापणाऱ्यांवरच नाही, तर कापायला सांगणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news