child abuse
राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी जनप्रक्षोभ वाढला आहे.  pudhari news network
नाशिक

Nashik News | चिंताजनक! शहरातही चिमुकल्या असुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी जनप्रक्षोभ वाढला आहे. त्यातच शहरातही चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनांनी रोष व्यक्त होत आहे. सिडकोत क्लासचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर जमावाने क्लासचालकाचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पित्याकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग, अत्याचार झाल्याच्या घटनाही शहरात उघड झाल्या आहेत. त्यामुळे चिमुकल्यांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत असल्याची भीती वर्तवली जात आहे. (It is feared that an unsafe environment is being created for children)

unsafe environment for children

शहरात १ जानेवारी ते २५ ऑगस्ट या कालावधीत अल्पवयीन मुला-मुलींसह महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये विनयभंग प्रकरणी १३९ गुन्हे दाखल असून, बलात्कार प्रकरणी ६६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शहरात चालू वर्षात महिलांवरील अत्याचार प्रकरणी २०५ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये पीडितांचे नातलग, ओळखीच्याच व्यक्ती असल्याचेही उघड झाले आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षात ३१ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला असून, ३२ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला आहे. पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांनुसार अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेचे नातलग, मित्रपरिवार, ओळखीच्या व्यक्तींचाच समावेश सर्वाधिक आढळला. त्यामुळे घरात, दारात किंवा रस्त्यावरही अल्पवयीन मुलींसह महिला सुरक्षित नसल्याची ओरड होत आहे. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून दामिनी पथक, महिला पोलिसांची गस्त वाढवली आहे. शैक्षणिक संस्थांमध्येही पोलिस हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. (Public outrage has increased due to incidents of abuse of children in the state)

लैंगिक अत्याचाराच्या २०५ घटना

चालू वर्षात २५ ऑगस्टपर्यंत २०५ गुन्ह्यांमध्ये पीडितांचे विनयभंग व बलात्कार झाले आहेत, तर मागील वर्षी बलात्काराच्या १२८, तर विनयभंगाच्या १७८ घटना घडल्या होत्या. महिला सुरक्षिततेसाठी शहर पोलिसांनी प्राधान्य दिले असून, तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली जात आहे. तसेच संशयितांची धरपकडही केली जात आहे. अत्याचाराच्या घटना घडत असल्यास किंवा कोणी त्रास देत असल्यास ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT