पुढारी विशेष : बालिकांवरील अत्याचारांचा मनोविकृत 'डंख'

'सायकोपॅथ': संस्कारक्षम वयात पाेर्नोग्राफीचे व्यसन; लैंगिक शिक्षण, मूल्य, संस्कारांचा अभाव
सायकोपॅथ
मनोविकृतीला मनोवैज्ञानिक 'सायकोपॅथ' अशी संज्ञा देतातfile photo
Published on
Updated on
नाशिक : निल कुलकर्णी

शालेय विद्यार्थीनी,अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव नाही. बदलापूर, काेल्हापूर, अकोला, नााशिकसह राज्यात अनेक ठिकाणी अत्याचार, आगळिक झाली आहे. बालवयात संस्कारांचा अभाव, पोर्नोसाईटचा सहज व स्वस्तात उपलब्ध होणारा डाटा, व्यसनाधीनता, विस्कळीत कुटुंबे, कामभावनाचे न जमलेले व्यवस्थापन, नैतिक मूल्य, संस्कारांचा ऱ्हास यामुळे अशा मनोविकृतीत वाढ होत असल्याचे मत मनोवैज्ञानिक, समाज अभ्यासकांनी नोंदवले. (Lack of morals in childhood, easy and cheap access to pornography, drug addiction, dysfunctional families, mismanagement of desire, loss of moral values, morals are increasing such mental disorders)

Summary

मनोविकृतीवर उपाय असे...

  • शिक्षण, जनजागृती, समाजात समानता, सन्मान आणि महिला अधिकारांविषयी शिक्षण देण्यासह मुलांना लैंगिकता शिक्षण योग्य वयात देणे.

  • 'गुड टच', 'बॅड टच'चे शिक्षण देणे. असे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाही प्रशिक्षण देणे.

  • लहानपणापासून मुलांशी सुसंवाद, बालवयात योग्य संस्कार, मूल्य शिकवण

  • योग, ध्यान, ओंकार जप आदी आध्यात्मिक मूल्यांसह मुलांचा भावनांक वाढवावा.

  • व्यसनी व्यक्तीचे पुनर्वसन, संशयित, वर्तनसमस्या असलेल्यांचे मानसिक परीक्षण करून समुपदेशन, उपचार देणे.

या मनोविकृतीला मनोवैज्ञानिक 'सायकोपॅथ' (Psychopath) अशी संज्ञा देतात. व्यक्तींमधील वर्तनदोष हिंसा किंवा पूर्वायुष्यातील शारिरीक आघात, व्यसनाधीनता, स्किझोफ्रेनिया, उन्माद असे मनोआजार या विकृत वर्तनाला कारणीभूत ठरू शकतात, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले.

वर्तनदोष, व्यसनाधीनता, शक्तीचे अवाजवी प्रदर्शन, मेंदूला इजा, उन्माद (मॅनिया-mania), मतिभ्रम किंवा 'स्किझोफ्रेनिया' (छिन्नमनस्कता-Schizophrenia), बालपणी किंवा पूर्व आयुष्यात झालेले शारीरिक व लैंगिक शोषण, विस्कटेले कौटुंबिक संबंध यामुळे व्यक्ती मुली, महिलांवर अत्याचार करू शकतात. ही मनोविकृतीच आहे.

डॉ. महेश भिरुड, मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक.

बलात्कारी लोकांचे वर्तन आणि मानसिकता विविध कारणांनी त्यांच्यावर प्रभाव असतो. यामध्ये वर्चस्व भावना, मानसिक असंतुलन, इतरांवर बळजबरीने नियंत्रण ठेवण्याची आणि त्या त्रासातून आनंद घेण्याची विकृती अशी यामागे कारणे असू शकतात. कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यावर प्रभाव टाकते. 'पोर्नोग्राफी'ने (Pornography) लैंगिक हिंसा किंवा अनुचित कल्पना, अतिशयोक्तीपूर्ण लैंगिक वर्तन अशा असामान्य वर्तनामध्ये वाढ होऊ शकते. ज्या व्यक्तींच्या लैंगिक अपेक्षा आणि वर्तनावर प्रभाव टाकते; प्रभावाची तीव्रता व्यक्तिसापेक्ष असते.

डॉ. मृणाल भारद्वाज, मानसशास्त्रज्ञ, नाशिक.

पीडितेला सहायता

  • मनोवैज्ञानिक सहायता : हिंसाचाराच्या शिकार झालेल्या महिलांसाठी मनोवैज्ञानिक सहायता आणि पुनर्वसन कार्यक्रम सुरू करणे.

  • सामाजिक समर्थन : महिलांना समर्थन देणारे गट आणि संसाधने निर्माण करणे, जेणेकरून त्यांना मदतीचा आधार मिळू शकेल.

  • त्यांच्या वर्तनाचा सामना करण्यासाठी मानसिक स्वास्थ्याचे मूल्यांकन, उपचार आणि समाजातील जनजागृती यांचा समावेश असलेली उपाययोजना करणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news