

सिडको : येथील उपेंद्रनगर भागात खासगी शिकवणीत विद्यार्थिनीचा विनयभंगप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षकाचा घर आठ अनोळखी व्यक्तींनी जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अंबड भागात पेट्रोलिंग करत असताना शनिवारी (दि. 24) रात्री ९ च्या सुमारास सात ते आठ जण उपेंद्रनगरमधील कृष्णा दहिभाते या शिक्षकाच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. ७ ते ८ अनोळखी व्यक्तींनी दगडफेक करत बाटल्यांमध्ये ज्वलनशील द्रव्य टाकून त्या बाटल्या पेटवून दहिभाते याच्या घराकडे फेकून ते पेटवत होते. पोलिसांची गाडी येताच हे आठ जण पळून गेले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी पवन परदेशी यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.