नाशिक-शिर्डी, सिन्नर प्रवास आजपासून इलेक्ट्रिक बसने File Photo
नाशिक

Nashik MSRTC News | नाशिक - शिर्डी, सिन्नर प्रवास आजपासून इलेक्ट्रिक बसने

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येथील प्रवाशांना नाशिक-शिर्डी आणि नाशिक-सिन्नर प्रवास इलेक्ट्रिक बसने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून बुधवार (दि. २८) पासून या मार्गावर बसेसच्या दर एक तासाला फेऱ्या निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी माहिती दिली

राज्याच्या ई-वाहन धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील वाहने राहतील असा निर्णय झाला आहे. राज्यातील जनतेला पुरेशा प्रमाणात व पर्यावरणपूरक सेवा देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत राज्यभरात ५१५० इलेक्ट्रिक बस चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विभागात १४ ई-बसेस नाशिक-बोरिवली, नाशिक-सप्तशृंगगड, नाशिक-त्र्यंबक व नाशिक-शिर्डी या मार्गांवर सुरू आहेत. सध्या दुसऱ्या टप्प्यात १० ई-बसेस प्राप्त झाल्या आहेत.

बुधवारी या बसेस नाशिक-शिर्डी, नाशिक-सिन्नर या मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. सकाळी ५ वाजता ते रात्री १० पर्यंत दर एक तासाच्या वारंवारीतेने या बसेस नाशिक-सिन्नर, नाशिक-त्र्यंबक या नवीन बसस्थानकातून (ठक्कर) व नाशिक-शिर्डी महामार्ग बसस्थानक येथून सुरू होणार आहेत.

असे आहेत दर

मार्ग- फुल- हाफ

नाशिक-सिन्नर : ६५- ३५

नाशिक-शिर्डी : २२०- ११५

या आहेत सुविधा

- पर्यावरणपूरक सेवा

- बससेवेमध्ये ५ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकिटाची सवलत

- बससेवेमध्ये महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार, अर्जुन तसेच द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा तसेच विधान परिषद सदस्य, अधिस्वीकृतिधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT