नाशिक : जुना आग्रा रोडवरील आदिवासी विकास भवनवर आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा बुधवारी (दि. २८) काढण्यात येणार आहे. तपोवन येथून मोर्चास सुरुवात होणार असून मोर्चात हजारो बांधव सहभागी होतील. त्यामुळे मोर्चा मार्गात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेतर्फे अधिसूचना काढली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.
तपोवन - स्वामी नारायण चौक - संतोष टी पॉईंट - काट्या मारुती चौक - दिंडोरी नाका - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल - सीबीएस सिग्नल - मोडक सिग्नल - आदिवासी विकास भवन.
- स्वामी नारायण चौक ते कन्नमवार पुल
- मिर्ची हॉटेल सिग्नल ते स्वामी नारायण चौक
- संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा
- रविवार कारंजा, सांगली बँक, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नलपर्यंत
- द्वारका सर्कल ते कन्नमवार पुल
- छत्रपती संभाजीनगरकडून वाहतूक मिर्ची हॉटेल सिग्नलवरून अमृतधाम, तारवाला चौक - कृऊबा समिती सिग्नल - पेठरोडकडे
- धुळेकडून यणारी वाहतूक अमृतधाम मार्गे तारवालानगर, पेठरोडकडे
- हॉटेल मिर्ची चौकातून स्वामी नारायण चौकाकडे येणारी वाहतूक अमृतधामकडे
- दिंडोरी नाक्याकडून शहरात जाणारी वाहतूक पेठनाका, मखमलाबाद नाका, रामवाडीकडून
- दिंडोरी नाक्याकडून जाणारी वाहतूक दिंडोरी नाका, तारवाला चौक, हिरावाडीकडे
- द्वारकाकडून कन्नमवार पुलाकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून
- मुंबई नाक्याकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, जुना सीटीबी सिग्नलमार्गे
- गंगापूर नाक्याकडून पंचवटीकडे जाणारी वाहतूक जुना गंगापूर नाका, रामवाडी पुलामार्गे
- रविवार कारंजाकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक मालेगाव स्टॅण्ड, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर रोडने मार्गस्थ