नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांचा दर्जा आणि टिकाऊपणा कायम ठेवण्याचे निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. गंगापूर रोड तसेच डोंगरे वसतिगृह ते शरणपूर पोलिस चौकी या मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते विकासकामांची त्यांनी शुक्रवारी (दि. ११) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कॅनडा कॉर्नर ते शरणपूर पोलिस ठाणे हा उर्वरित रस्ता पुढील दहा दिवसांत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या.
या कार्मामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच भविष्यात रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्या ऊद्भवू नयेत, यासाठी नियोजन करण्यावर पाहणीदरम्यान भर देण्यात आला. रस्त्यालगत असलेल्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, एमएनजीएलची गॅस पाइपलाइन, ओएफसी तसेच खासगी कंपन्यांच्या ओएफसी केबल्सचीही पाहणी करण्यात आली. रस्ते खोदकाम अथवा बांधकाम करताना या सर्व उपयोगिता सेवांचे संरक्षा करून संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कॉमन मॅन चौकातील विद्युत खांबांचे योग्य पद्धतीने स्थलांतर करून डावीकडील वळण वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे निर्देशही देण्यात आले. संपूर्ण मार्गावर आवश्यक ठिकाणी डावे वळण अडथळामुक्त ठेवून वाहनचालकांना सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगण्यात आले.
रस्तेकामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी अधीक्षक अभियंता
किशोर पाटील यांनी रस्ते बांधकामातील आवश्यक खबरदारी आणि तांत्रिक बाबींबाबत सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गुणवत्ता अभियंता नितीन पाटील, अधीक्षक अभियंता गुणवत्ता नियंत्रण (सेवानिवृत्त) किशोर पाटील, एनटीकेएमएचे उपआयुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी, उपअभियंता नीलेश साळी तसेच कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. गतीसोबत दर्जाही महत्त्वाचा कुंभमेळ्याच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने प्रमुख रस्ते दर्जेदार, टिकाऊ आणि तांत्रिक मानकांनुसार तयार असणे आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तेबाबत तडजोड करू नये, कालमयदित काम करून रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश आरावांनी दिले.
काँक्रिटीकरणाच्या गुणवत्तेची तपासणी
गंगापूर नाका ते एचडीएफसी बँक मार्गाचीही पाहणी करण्यात आली. गंगापूर नाका ते कॅनडा कॉर्नर या टप्प्यातील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता कॅनडा कॉर्नर ते शरणपूर पोलिस ठाणे या उर्वरित टप्प्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. काँक्रिटीकरण झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची प्रक्रिया, कामाची गुणवत्ता आणि निर्धारित तांत्रिक निकषांची पूर्तता यांचा आढावा घेण्यात आला. रस्ते बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच पुढील काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गरवारे ते एक्स्लो डिसेंबरपर्यंत होणार खुला, मार्च २०२७ ची अंतिम मुदत : त्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे मनपाचे नियोजन
नाशिक : शहराच्या वाहतूक व्यवस्थेसह अंबड-सातपूर औद्योगिक क्षेत्राशी जोडणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गरवारे ते एक्स्लो पॉइंट आणि एक्स्लो पॉइंट ते पपया नर्सरी या रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे. कुंभ आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि. ११) या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी कामाचा वेग कायम ठेवतानाच गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन कायाच्या सत्चना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात आल्या.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या कामांसाठी मार्च २०२७ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण झालेल्या रस्त्यांचे टप्पे वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये उर्वरित अंतिम कामे पूर्ण केली जाणार आहेत. या रस्त्यांमुळे अंबड-सातपूर औद्योगिक क्षेत्रातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.