Onion News  Pudhari
नाशिक

Kalwan Onion Farmers Protest | कळवणला कांदा फेकत शेतकरी संतप्त

Kalwan Onion Farmers Protest | तहसीलदारांना निवेदन, सरकारी धोरणांचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

कळवण : पुढारी वृत्तसेवा

सरकारने कांद्याला १,२३५ रुपयांचा बाजारभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करीत कळवण येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून देत संताप व्यक्त केला.

सरकारने जाहीर केलेली १,२३५ रुपयाची खरेदी तत्काळ बंद करून शेतकऱ्यांना कमीत कमी २,५०० ते ३,००० रुपये क्विटलप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, शेती व शेती उपयुक्त कामासाठी ट्रॅक्टरला मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावे, रासायनिक खतांच्या किमती स्थिर ठेवून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावीत, नाफेडचा कांदा मार्केट कमिटीत खरेदी करून मार्केटमध्ये त्याची नोंद करावी, विकलेल्या मालाला १,५०० रुपये अनुदान द्यावे या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

कळवण बसस्थानकासमोर रस्त्यावर कांदा फेकून देत सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना निवेदन देण्यात आले.

प्रशासकीय कार्यालय मानूर येथे ठिय्या आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी विलास रौंदळ,महेंद्र हिरे, घनश्याम पवार, काशीनाथ गुंजाळ, संदीप शिंदे, शशिकांत हिरे, योगेश पगार, रामकृष्ण जाधव, महेंद्र पवार, रामा पाटील, विनोद खैरनार, जगन पाटील, बबन वाघ, संजय पाटील, मनोज रौंदळ, केवळ रौंदळ, कैलास बच्छाव, शिवाजी रौंदळ, प्रसाद निकम, एन. के. आहेर, सुभाष रौंदळ, संजय निकम, दिनेश खैरनार, मधुकर पाटील, सुनील मोरे, कैलास पाटील हे शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT