Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Nashik Kala Kumbh festival|सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये 'कलाकुंभ' महोत्सव

सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये 'कलाकुंभ' महोत्सव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकनगरीत कलात्मक आणि सांस्कृतिक जागर करण्यासाठी संस्कार भारतीतर्फे दि. २४ आणि २५ ऑक्टोबरला दोनदिवसीय 'कलाकुंभ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अविराज तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गंगापूर रोडवरील केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजजवळील, प्रसाद चौकातील उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय प्रांगणात दोन्ही दिवस सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.

प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. संस्कार भारतीच्या ४५ वर्षांच्या परंपरेनुसार भारतीय प्राचीन कला, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव होत आहे. या दोनदिवसीय महोत्सवात ४० विविध प्रकारच्या कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यात २०० हून अधिक कलाकार आपली कलाकृती सादर करतील. महोत्सवात शास्त्रीय, नाट्य, भाव, भक्ती व लोकसंगीतासह वाद्यवादनाचे सुरेल कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत.

भरतनाट्यम, कथ्थक, आदिवासी नृत्य, एकपात्री व बहुपात्री नाट्यप्रयोग नाशिककरांना अनुभवता येतील. याशिवाय रांगोळी, छायाचित्रण, चित्रकला, ऐतिहासिक वस्तू, कागदी हस्तकला व शिल्पकलेचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. कलाकारांच्या मुलाखती, व्याख्यान, चर्चासत्र व कवी संमेलन ही या महोत्सवाची प्रमुख आकर्षणे असतील. या सोहळ्यास अडीच ते तीन हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याचा अंदाज संस्कार भारतीचे अध्यक्ष अविराज तायडे, कोषप्रमुख सुबोध जोशी आणि अखिल भारतीय मंत्री रवींद्र बेडेकर यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT