नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने, घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने, नाशिककरांना उन्हाचा तडाखा असह्य होत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढला आहे. नाशिकचे तापमान सलग तीन दिवसांपासून ४० अंशांच्या पुढे आहे. सध्या अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
या उन्हात बाहेर पडणे धोकेदायक असून बांधकाम कामगार, शेतकरी, वाहतूक कर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घेण्याचे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जळगावचा पारा ४५ अंशांवर जळगाव : जळगाव जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी कमाल तापमान ४५.५, तर किमान २७.५ अंश इतके नोंदविले गेले. दुपारच्या वेळी जळगावकरांना जणू आगीच्या ज्वालांचा अनुभव येत आहे.
सकाळी १० पासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले. हवेत आर्द्रता कमी असल्याने घामाबरोबरच उन्हाचे चटके जास्त बसत होते. नंदुरबारमधे पारा ४४ अंशांवर नंदुरबार : जिल्हाभरात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असून, मंगळवारी तापमान ४४ अंशांवर होते. सकाळी ११ पासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होते. परिणामी, बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे.
थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने, घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने, नाशिककरांना उन्हाचा तडाखा असह्य होत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढल्याने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बाहेरील तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आणि त्यात आर्द्रता जास्त असेल, तर शरीराची उष्णता नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.
अशा परिस्थितीत हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा धोका वाढतो. सध्या तापमान सलग तीन दिवसांपासून ४० अंशांच्या पुढे आहे. सध्या अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने, तेथील वाहतूक पोलिस प्रशासनाने दुपारच्या सुमारास सिग्रल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये अद्यापही अशाप्रकारचा निर्णय घेतला गेला नसल्याने, सिग्नलवर उभे राहणे नाशिककरांसाठी तापदायक ठरत आहे.
हीट स्ट्रोकची प्रमुख लक्षणे अंगाचे तापमान अचानक वाढणे, डोकेदुखी आणि चक्कर, उलटी किंवा मळमळ, घाम कमी येणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, गोंधळ, अस्वस्थता किंवा बेशुद्ध पडणे,
हीट स्ट्रोक आल्यास तातडीने हे करा ! व्यक्तीला सावलीत किंवा थंड जागी हलवा, थंड पाण्याचे कपडे शरीरावर ठेवा, पाणी किंवा ओआरएस द्या, (शुद्धीत असल्यास), त्वरित रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा, बर्फ थेट शरीरावर लावणे टाळा.
उष्णतेचे धोकादायक स्तर ३५ अंश सेल्सिअस - शरीरावर ताण सुरू, ४० अंश सेल्सिअस : हीट वेव्हचा धोका, ४५ अंश सेल्सिअस गंभीर आरोग्य संकट, ५० अंश सेल्सिअस : जीवघेणा धोका संभव
हीट स्ट्रोक नेमका कधी होतो? वैद्यकीय भाषेत शरीराचे अंतर्गत तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आणि व्यक्तीला चक्कर, गोंधळ, शुद्ध हरपणे, झटके येणे यासारखी लक्षणे दिसू लागली, तर त्याला हीट स्ट्रोक मानले जाते. हा जीवघेणा प्रकार असून, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो
हीट स्ट्रोकचा यांना धोका बांधकाम कामगार, शेतकरी, वाहतूक कर्मचारी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मधुमेह, हृदयरोग किंवा रक्तदाबाचे रुग्ण दिवसभर उन्हात काम करणारे मजूर पाणी कमी पिणारे किवा निर्जलीकरण झालेली व्यक्ती