नाशिक

नाशिक : पाणी घ्यायला खाली उतरली, गाडी सुटली अन्…

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा; 

देवळाली कॅम्पला रेल्वेगाडी थांबली, आई आपल्या तान्ह्या बाळाला आणि दोन अल्वयीन भावांना गाडीत सोडून रेल्वेस्थानकावर पिण्याचे पाणी घ्यायला खाली उतरली मात्र परतण्याआधीच गाडी सुटली अन् त्यांची ताटातूट झाली. मात्र त्यांची रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे परत भेट झाली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत हे शक्य झाले.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाला सायंकाळी देवळाली स्थानकावरील उपव्यवस्थापक अनिल सागर यांनी फोनवरून माहिती दिली की, उत्तर प्रदेशातील गंगा विक्रम बसफोर (वय 19) या महिलेचे दोन अल्पवयीन भाऊ पवन (12 वर्ष) आणि राजेश (8 वर्षे) तसेच नवजात बालक रेल्वे क्रमांक 13202 मध्ये राहिले आहे. ही महिला देवळाली स्थानकात पिण्याचे पाणी आणण्यासाठी उतरली असता अचानक गाडी सुरू झाल्यामुळे तिचे भाऊ आणि बाळ गाडीमध्येच राहिले. अनिल सागर यांनी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाच्या शोभा मोटे यांच्याशी संपर्क साधून मुलांचा शोध घेण्याची सूचना केली.

नाशिकरोडला गाडी आल्यावर शोभा मोटे आणि हेडकॉन्स्टेबल समाधान गांगुर्डे गाडीत गेले. नवजात अर्भक आणि अल्पवयीन दोन भावांना सुखरूपपणे गाडीतून खाली उतरवले. आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. देवळाली स्थानकात कळविल्यावर ही महिला नाशिकरोडला आली. बाळ आणि भावांची भेट होताच तीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पंचासमोर या तीघांना महिलेच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वेसुरक्षा दल आणि पोलिसांचे तिने आभार मानले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT