नाशिक

Nashik Gram Panchayat Election : ४८ ग्रामपंचायतींसाठी अधिसूचना प्रसिद्ध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १४९ ग्रामपंचायतींमधील सरपंचांच्या ५ व सदस्यांच्या २०२ रिक्त जागांची निवडणूक अधिसूचना शुक्रवारी (दि. ६) तहसील कार्यालायांमार्फत घोषित करण्यात आली. येत्या १६ तारखेपासून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन सादर करता येणार आहे, तर ५ नोव्हेंबरला मतदान व ६ तारखेला मतमोजणी होणार आहे.(Nashik Gram Panchayat Election)

संबधित बातम्या :

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या मंगळवारी ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०६८ ग्रामपंचायतींमधील २९५० सदस्य व १३० सरपंचपदांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येईल. तर सदस्य व सरपंचांच्या २०७ रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका लागल्या आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक कार्यक्रमानुसार तहसीलदारांनी शुक्रवारी (दि. ६) निवडणुकांची अधिसूचना घाेषित केली. उमेदवारांना दि. 16 ते 20 ऑक्टोबर या काळात नामनिर्देशन दाखल करता येईल. 23 ला छाननी व 25 तारखेला दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत असेल. माघारीनंतर रिंगणामधील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप केले जाईल. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान घेण्यात येईल. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. (Nashik Gram Panchayat Election)

सार्वत्रिक निवडणुका

इगतपुरी : टाके घोटी, धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दाैंडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सद्दो.

बागलाण : चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी.

त्र्यंबकेश्वर : महादेवनगर, सोमनाथनगर, मेटघर किल्ला, साप्ते, सापगाव, हरसूल.

नाशिक : जलालपूर, महादेवपूर, गंगाम्हाळुंगी, पिंपळगाव ग., सुभाषनगर.

कळवण : सरलेदिगर, कोसवन, खडकी, देसगाव, करंभेळ क.

देवळा : मेशी, माळवाडी, फुलेमाळवाडी

येवला : शिरसगाव लौकी, लाैकी शिरस

दिंडोरी : गवळवाडी

मालेगाव : मांजरे

निफाड : पालखेड

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT