गंगापूर धरणातू विसर्गात घट करण्यात आल्याने गाेदावरीचा पूर ओसरला आहे.   (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Godavari River: विसर्गात घट; गोदेचा पूर ओसरला

पुढील चार दिवस हलक्या सरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने आणि धरणांतील विसर्गदेखील घटविल्याने गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे. तीन दिवसांपासून गंगापूर धरणातून 6,336 क्यूसेक वेगाने सुरू असलेला विसर्ग बुधवारी (दि. ९) 2,205 क्यूसेकवर आणल्याने जलस्तर नियंत्रणात आला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 8.8 मिमी पावसाची नोंद इगतपुरीत झाली. तर सर्वात कमी येवला (0.8 मिमी), कळवण (0.9) तालुक्यात झाली.

सध्या पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. पुढील चार दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला असून, हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी दिवसभरात 2.4 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गत महिन्याभरापासून पावसाने थैमान घातले होते. परिणामी, यंदा जुलै महिन्यातच जिल्ह्यातील धरणांची पातळी 55 टक्क्यांवर गेली. १० वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात गंगापूर धरणाने ६५ टक्क्यांची पातळी ओलांडली. पावसाळ्याने अजून तीन महिने शिल्लक असल्याने दारणा, कडवा, पालखेड, गंगापूर धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत 'जायकवाडी'ला 20 टीएमसी पाणी गेले आहे.

सद्यस्थितीत धरणांमधून होत असलेला विसर्ग

धरण - क्यूसेक

  • दारणा - 1100

  • गंगापूर - 2205

  • पालखेड -696

  • पुणेगाव -550

  • भोजापूर -539

  • भावली -481

  • भाम -1245

  • वालदेवी -599

  • आळंदी - 243

  • कश्यपी -1000

  • कडवा -804

  • करंजवण -630

  • नांदूरमध्यमेश्वर बंधारा -12,620

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT