Nashik Godavari Aarti : ‘गोदा’ पूरमयी… पण भक्तीमय आरतीने उजळली संध्याकाळ

अंजली राऊत

गोदावरीला आलेल्या पुरामुळे 'गोदा' आरतीचे महत्व अधिक वाढले असून भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळतोय

(छाया : रुद्र फोटो)

गोदावरी आरती ही एक धार्मिक विधी आहे, जी दररोज सायंकाळी 7 वाजता नियमितपणे रामकुंडावर केली जाते.

(छाया : रुद्र फोटो)

पुराच्या स्थितीतही भाविकांनी आरतीमध्ये भाग घेणे, त्यांची श्रद्धा आणि भक्ती दर्शवते

(छाया : रुद्र फोटो)

गोदावरी आरतीमुळे लोकांच्या मनात शांती आणि सकारात्मकता वाढते, असा नाशिककरांचा अनुभव आहे. 

(छाया : रुद्र फोटो)

गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात उभे राहून आरती करणे, हा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव नाशिककरांनी अनुभवला

(छाया : रुद्र फोटो)

गोदावरी आरतीच्या निमित्ताने शहरातील लोक एकत्र येतात, ज्यामुळे एक community spirit वाढतो.

(छाया : रुद्र फोटो)

नाशिकमध्ये संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून विसर्ग सुरु असल्याने गोदामाईला पूर आल्याने दुतोंड्या मारुती हे पूर आल्याचे प्रमाण मानले जाते.

(छाया : रुद्र फोटो)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

रामायण काळातील 'नाशिक' : प्रभू श्रीराम कोठे थांबले होते?