FDA Action Pudhari
नाशिक

Nashik FDA | 'एफडीए'मध्येच मोठी भेसळ! नाशिकच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस

Nashik FDA | दूध पावडर प्रकरण भावले : शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथे उघडकीस आलेल्या तब्बल १७ लाख रुपयांच्या संशयास्पद दूध पावडर साठा प्रकरणात विहित कायदेशीर कर्तव्य बजावण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत, सहायक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली.

याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला असून, आता अंतिम निर्णयाकडे लक्ष लागून आहे. एकीकडे भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच, दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथील दूध पावडर प्रकरणात विभागातीलच दोन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणातील चौकशीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची शिफारस करण्यात आल्याने एफडीएच्या अंतर्गत यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सह आयुक्त मंगेश माने यांनी या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान सहायक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली.

आता मुंढेंच्या निर्णयाकडे लक्ष

नाशिक विभागाने चौकशीचा अहवाल एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे आता या दोन्ही अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

पुतळेवाडीतील साम्याने प्रकार उघड

गेल्या जुलै महिन्यात पुतळेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद दूध पावडरचा साठा आढळून आला होता. या साठ्याची किंमत सुमारे १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तपासणीदरम्यान दूध पावडरमध्ये भेसळीचा संशय निर्माण झाला होता. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीविरुद्ध यापूर्वीही भेसळीचे गुन्हे असल्याचे समोर आले. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन ठोस कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नसल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारदार भाऊसाहेब बैरागी यांनी या अधिकाऱ्यांबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT