नाशिक

नाशिक : जिल्ह्यातील पोलिसपाटील भरतीत आरक्षणाचा पेच | Police Patil Recruitment

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील पोलीसपाटील व कोतवालांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पदांचे गावनिहाय आरक्षण व जाहिरनामा तयार केला जात आहे. मात्र, इगतपूरी, त्र्यंबक, देवळा व चांदवड या तालूक्यात विशेष मागास प्रवर्गाच्या मंजूर पदासाठी आरक्षण ठरवितांना एकाही गावात 'विमाप्र'ची लोकसंख्या दर्शविलेली नाही. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. (Police Patil Recruitment)

जिल्ह्यात पोलीसपाटील यांची एकुण १ हजार ८४३ पदे मंजूर असून सध्या १२०४ पदे भरली आहेत. त्यामुळे ६३९ पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी कोतवालांची १४८ पदे भरण्यात येणार आहे. पोलीसपाटील यांची पदे भरताना शासनाच्या १६ आॅक्टोंबर २००८ च्या नियमानूसार आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जाहिरमाना प्रसिद्ध करत एकाच दिवशी पोलीसपाटील व कोतवाल या दोन्ही पदांसाठी परिक्षा घेण्याचे निश्चित केले आहे.  (Police Patil Recruitment)

आरक्षण निश्चित करतांना विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण ठरविताना चांदवड व देवळ्यात मंजूर ३ पदांसाठी एकाही गावात विमाप्रची लोकसंख्या दर्शविण्यात आलेली नाही. तथापि शासन निर्णया नूसार लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करताना क्रमानुसार ५९ पैकी ५६ गावांमधील आरक्षण निश्चित केली आहे. एकूण सर्व गावांमध्ये विमाप्र लोकसंख्या शुन्य आहे. त्यामूळे ५९ गावांपैकी ५६ गावे वगळता पिंपळगांव घाबली व नवापूर (ता. चांदवड) व दहिवड (ता. देवळा) हे गावे शिल्लक आहे. इगतपूरी व त्र्यंबकेश्वरमधील काही गावांबाबतची समस्या कायम आहे. विमाप्रची लोकसंख्या तेथे शुन्य असल्याने उमेदवार न मिळाल्यास त्या प्रवर्गाची जागा कोणत्या आरक्षणातुन भरावी, असा प्रश्न प्रशासनाला भेडसावतो आहे. त्यामुळे या प्रश्नावर शासनाने गृहविभागाच्या अवर सचिवांकडे पत्राद्वारे मार्गदर्शन मागविले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर भरतीचा पुढचा मार्ग मोकळा होईल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT