Arrested Pudhari
नाशिक

Nashik Dr Nilesh Jejurkar arrested | पत्नीच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजूरकर अटकेत

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजूरकर अटकेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या दालनात त्यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह वैद्यकीय अहवालात फेरफार केल्याच्या संशयाच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

डॉ. मनीषा यांनी दि. ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील अपार्टमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. डॉ. नीलेश यांच्यावर पत्नीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात डॉ. नीलेश यांनी जिल्हा न्यायालयानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मात्र गुरुवारी (दि. १७) सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, डॉ. मनीषांच्या शवविच्छेदन अहवालाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठिकाणच्या घटनेच्या छायाचित्रांवरून खिडकीला दोरी बांधून आत्महत्या करणे शक्य होते का, याबाबत न्यायालयात संशय व्यक्त केला होता. मृतदेहाचे विच्छेदन जिल्हा रुग्णालयात झाले होते. डॉ. नीलेश याच रुग्णालयात कार्यरत असल्याने पदाचा गैरवापर करून अहवालात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT