नाशिक

Nashik Crime News : मातोरी, मखमलाबादला दहशत करणारा तडीपार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुका पोलिस व म्हसरूळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांनी तडीपार केले आहे. रोशन दिनकर लोखंडे (रा. मातोरी, ता. नाशिक) असे तडीपार केलेल्या संशयिताचे नाव आहे. राकेश विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, आर्म ॲक्ट अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याने मातोरी, मखमलाबाद परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी लोखंडे याला जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सण, उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रोशन लोखंडे यास आठ महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT