Nashik Crime News : सातपूर परिसरात मनोरुग्णाकडून चार वाहनांची जाळपोळ File Photo
नाशिक

Nashik Crime News : सातपूर परिसरात मनोरुग्णाकडून चार वाहनांची जाळपोळ

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Nashik Crime News: Four vehicles set on fire by a mentally ill person in Satpur area

सातपूर : पुढारी वृत्तसेवा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. येथील जाधव संकुल, कातकडेनगर येथील डीएड कॉलेजच्या इमारतीत उभ्या असलेल्या चार दुचाकी जाळण्यात आल्या.

डीएड कॉलेज इमारतीत मातोश्री गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चार दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावली. या घटनेत दोन अॅक्टिव्हा आणि इतर दोन दुचाकींचे नुकसान झाले. या जाळपोळीचे कृत्य पप्पू गरुड (रा. जाधव संकुल) या कथित मनोरुग्णाकडून करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मनोज तांबे आणि रवींद्र देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर सातपूरचे हवालदार दीपक घरपडे आणि तुषार देसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मनोरुग्णाला मनोरुग्णालयात पाठवण्याची मागणी

आरोपी पप्पू गरुड हा मनोरुग्ण असून, तो जाधव संकुल परिसरात नेहमीच अशाप्रकारे उपद्रव करतो. पोलिस त्याला वारंवार ताब्यात घेतात. मात्र, मनोरुग्ण असल्याची कागदपत्रे दाखवून तो सहज सुटतो. पुन्हा असे कृत्य करतो. त्यामुळे नागरिकांनी या मनोरुग्णाला मनोरुग्णालयात पाठवण्यासाठी लेखी निवेदन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT