नाशिक

Nashik Crime : सुरक्षा रक्षकाकडून कारचा अपहार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओळखीचा गैरफायदा घेत सुरक्षा रक्षकाने एकाच्या कारचा अपहार केल्याचा प्रकार हनुमान नगर येथील पार्क साईट येथे घडला. याप्रकरणी कमलेश सुरेश दिगांणे (३५) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विशाल सुनिल बर्वे याच्याविरोधात अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. Nashik Crime

कमलेश यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विशाल हा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने कमलेश यांच्या आईकडून एमएच १५ जेडी १९८३ क्रमांकाची ९ लाख रुपयांची कार घेऊन गेला. मात्र तो कार न देताच पसार झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT