नाशिक : पुढारी वृत्तसेवा, सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करीत प्राणघातक हल्ला प्रकरणातील १४ संशयितांना मकोका लावण्यात आला आहे. सिडकोतील बाजीप्रभू चौकात कोष्टीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी १४ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीव सिंगल यांनी या सर्व संशयितांवर मकोका अन्वये कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.
सिडकोतील बाजीप्रभू चौकात भाजपचा पदाधिकारी व सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर गेल्या १६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. यात शहरातील सराईत गुन्हेगारांची टोळीच सहभागी होती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या १४ जणांवर मकोकानुसार कारवाई केली होती. तसेच याबाबतचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे पाठविला होता. त्यास आता मंजुरी देण्यात आली आहे.
मकोका लावलेले संशयित
किरण शेळके (२९, रा. अंबिका चौक, पंचवटी), जयेश तथा जया हिरामण दिवे (३३, रा. पंचवटी), विकी कीर्ती ठाकूर (२८, रा. दसकगाव, नाशिकरोड), गौरव संजय गांगुर्डे (३२, रा. पंचवटी), किरण ज्ञानेश्वर क्षीरसागर (२९, रा. पंचवटी), सचिन पोपट लेवे (२३, रा. क्रांतिनगर), किशोर बाबूराव वाकोडे (२२, रा. कथडा, जुने नाशिक), राहुल अजयकुमार गुप्ता (२८, रा. शनिचौक), अविनाश गुलाब रणदिवे (२६, रा. सातपूर), श्रीजय संजय खाडे (२३, रा. जुना आडगाव नाका), जनार्दन खंडू बोडके (२२, रा. पंचवटी), सागर कचरू पवार (२८, रा. गणेशवाडी), पवन दत्तात्रेय पुजारी (२३, रा. तारवालानगर, पंचवटी), महेंद्र उर्फ गणपत राजेश शिरसाट (२८, रा. दत्त चौक, पंचवटी).
हेही वाचा :