Pune Crime News Pudhari
नाशिक

Nashik College Road Spa Raid | कॉलेजरोडवरील स्पामध्ये अनैतिक व्यवसायावर छापा; मालक, व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा

Nashik College Road Spa Raid | कॉलेजरोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश करत मालक आणि व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर पोलिसांनी कॉलेजरोड परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकून तिथे सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत स्पाची मालक, व्यवस्थापक आणि तिथे उपस्थित असलेल्या दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पामध्ये परप्रांतीय महिलांकडून ग्राहकांकडून पैसे घेऊन अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

१५ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.५० वाजता गंगापूर रोडवरील डिसूझा कॉलनी येथील श्रुती अपार्टमेंटमधील 'डेझी वेलनेस स्पा' येथे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत स्पाची मालक कविता पवन कोरडे (रा. मखमलाबाद), व्यवस्थापक अर्चना संजय मोरे (रा. सातपूर) तसेच ग्राहक म्हणून उपस्थित असलेले आशुतोष चंद्रकांत अमृते (रा. द्वारका) आणि रवि भागवत (रा. मखमलाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान स्पामध्ये परप्रांतीय तीन महिलांना ग्राहकांकडून पैसे घेऊन अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार संबंधित महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिला पोलिस अंमलदार प्रचिती बाळासाहेब गोसावी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका कवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पा सेंटरमधील आर्थिक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, ग्राहकांची नोंदवही तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग तपासला जात आहे.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमधील कागदपत्रे व इतर महत्त्वाची माहितीही ताब्यात घेतली असून, या व्यवसायामागे आणखी कोणाचे आर्थिक किंवा व्यवस्थापकीय संबंध आहेत का, याचाही शोध सुरू आहे.

शहरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही गंगापूर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT