Raigad Crime : आदराचा मुखवटा, ७६ वर्षांचे आजोबा अन् हातचलाखी

गोव्यातील ज्वेलर्सना लुटणारी गँग अखेर रायगडमध्ये गजाआड
Gold Jewellery Theft
गोव्यातील कांदोळी येथील उदय गोल्डस्मिथ ज्वेलर्स या प्रसिद्ध सराफ दुकानात हातचलाखीने दागीने चोरताना सीसीटिव्ही फूटेजमध्ये कैद झालेली पाच जणांची सराईत टोळी.pudhari photo
Published on
Updated on

जयंत धुळप, रायगड

दागिने पाहण्याच्या बहाण्याने ज्वेलरच्या दुकानात यायचे, बोलण्यात गुंतवून दुकानदाराचे लक्ष विचलित करायचे आणि काही सेकंदात सोन्याचे दागिने लंपास करायचे... अशाच अट्टल हातच-लाखीने गोवा आणि महाराष्ट्रातील सराफांची झोप उडवणारी एक आंतरराज्य टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांतील लोणेर येथील एका हॉटेलमधून या टोळीतील दोन महिलांसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल २२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

आदरयुक्त वागणूक; संशय टाळण्यासाठी आसंशय अनोखी पद्धत आरोपींची होती. या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत शातीर आणि चक्रावून टाकणारी होती. टोळीतील तरुण आरोपी सतीश नामदेव शिंदे आणि मंगेश भाऊ सुर्वे हे दुकानात शिर-ल्यापासून ते दागिने पाहण्यापर्यंत, टोळीतील ज्येष्ठ सदस्य ७६ वर्षांचे आजोबा पांडुरंग गणपत पवार, ६५ वर्षीय विमल राजेंद्र जाधव आणि ६० वर्षीय ज्योत्स्ना आनंद पवार यांना सर्वांसमोर अत्यंत आदराची वागणूक देत असत.

या घरातल्या मोठ्या व्यक्ती आहेत आणि यांच्यासाठीच दागिने खरेदी करायचे आहेत, असा आभास ते निर्माण करायचे. त्यांच्या या कौटुंबिक आणि सुसंस्कृत वागण्यामुळे दुकानदाराला किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना ते चोर असावेत, अशी तीळमात्रही संशय येत नसे. सराफांचा हाच गाफीलपणा आणि विश्वास या टोळीच्या पथ्यावर पडायचा. याच आदराच्या मुखव-ट्याआड दुकानदाराचे लक्ष विचलित केले जायचे आणि क्षणात दागिन्यांवर डल्ला मारला जायचा.

Gold Jewellery Theft
Pune Crime Review 2025: गुन्हेगारी, अपघात, ड्रग्ज रॅकेट्स; 2025 मध्ये पुणे हादरले

कांदोळीत घातला होता दरोडा; १६ अंगठ्या गायब

या आंतरराज्य टोळीने २६ जून रोजी गोव्यातील कांदोळी येथील उदय गोल्डस्मिथ ज्वेलर्स या प्रसिद्ध सराफ दुकानाला याच पद्धतीने लक्ष्य केले होते. दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या या टोळीने अत्यंत शातीरपणे दुकानदाराची नजर चुकवून सोन्याच्या १६ अंगठ्यांवर डल्ला मारला आणि तिथून पळ काढला. चोरीचा प्रकार उघडकीस येताच गोव्यात मोठी खळबळ उडाली. कळंगुट पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथकाची स्थापना करून चोरांचा माग काढण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने दाखवला रस्ता

गोवा पोलिसांचे पथक पोलिस उप निरिक्षक परेश सिनारी यांच्या नेतृत्वाखाली तपासावर होते. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदा रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासाची सुई थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याकडे वळाली. आरोपी गोव्यातून पळून रायगडमधील महाड परिसरात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.

हॉटेल महाराजा लॉजिंगवर मध्यरात्री छापा

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी गोवा पोलिसांचे पथक रायगडमधील गोरेगाव पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथील स्थानिक पोलिसांनी तातडीने मदतीचा हात दिला. गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे महाड तालुक्यातील लोणेरे येथील महाराजा लॉजिंग या हॉटेलला वेढा घातला. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईत हॉटेलच्या खोलीतून पाचही आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीं-कडून चोरीला गेलेल्या १६ पैकी १५ सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या आहेत, ज्यांची बाजारपेठेतील किंमत तब्बल २२ लाख रुपये आहे. उर्वरित एक अंगठी हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. यामध्ये ७६ वर्षीय पांडुरंग गणपत पवार, ४१ वर्षीय सतीश नामदेव शिंदे, ३५ वर्षीय मंगेश भाऊ सुर्वे आणि ६० ते ६५ वर्षीय ज्योत्स्ना आनंद पवार हे सर्व महाड तालुक्यातील करंजाडी गावचे रहिवासी आहेत. तर ६५ वर्षीय विमल राजेंद्र जाधव ही महिला सातारा जिल्ह्यातील कोरेगावची रहिवासी आहे. नजर हटी दुर्घटना घटी; आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पोलिसांनी दिलेल्या माहिती-नुसार, ही टोळी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दुकानदाराचे लक्ष विचलित करून हातचलाखीने दागिने चोरी करण्यात सरावलेली आहे. यापूर्वीही त्यांच्यावर गोव्यात अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. गोव्यात गुन्हा करून महाराष्ट्रात सुरक्षित आश्रय घेण्याचा या टोळीचा डाव दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी उधळून लावला आहे.

Gold Jewellery Theft
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

कळंगुट पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा हात आहे का आणि त्यांनी इतर कुठे कुठे अशा चोऱ्या केल्या आहेत, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सराफ व्यापाऱ्यांनी अशा संशयास्पद आणि अति-आदर दाखवणाऱ्या ग्राहकां-पासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news