देवळा : तालुक्यातील दहिवड व चिंचवे या गावांच्या सरहद्दीवरील चोर चावडी धबधब्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.३१) सकाळीच्या सुमारास घडली. अन्सारी शाहिद अख्तर (वय १९, रा.जाफरनगर मालेगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेने मालेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मालेगाव येथील अन्सारी शाहिद अखतर, अमदान अब्दुल हुसेन, शर्जिल खान अमीर खान, अनस नदीम सय्यद हे युवक दहिवड येथील धाब्यावर अंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अन्सारी अख्तर हा तरुणाचा पाण्याबरोबर वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुवर, पोलिस हवालदार खुरासने, नितीन बारहाते, होमगार्ड घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी मालेगाव येथील शकील तैराकी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. याबाबत देवळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.