नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा-विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जय्यत तयारी केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण(दक्षिण) व नाशिक महानगर कार्यकारिणी पाठोपाठ नाशिक जिल्हा ग्रामीण(उत्तर)ची कार्यकारिणीदेखील जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी जाहीर केली आहे. दहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, १३ चिटणीस, ५८ कार्यकारिणी सदस्य तर ५५ निमंत्रित सदस्यांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
संबधित बातम्या :
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण(उत्तर) अध्यक्ष शंकर वाघ यांनी दिली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुधाकर पगार, सोनाली जाधव, प्रमोद सस्कर, ललिता कुवर, सचिन निकम, किशोर चव्हाण, मोहन शर्मा, माणिक देसाई, निशा जाधव, सोनाली पाटील, सरचिटणीसपदी भूषण कासलीवाल, सुवर्णा जगताप, पंढरीनाथ पिठे, आनंद शिंदे, संजय सानप, संतोष केंद्रे, चिटणीसपदी रवींद्र आहेर, हेमंत बोरस्ते, कल्पना भरसट, वैशाली पगारे, नारायण पवार, सोपान दरेकर, समीर समदडिया, विठ्ठल गावित, प्रकाश कडवे, योगेश चौधरी, नितीन गांगुर्डे, विक्रम निकम, शिवाजी कराळे, कोषाध्यक्षपदी गोविंद कोठावदे, कार्यालय प्रमुखपदी कुणाल खैरनार, शा.जि.निवडणूक कार्यालय प्रमुखपदी मदन भुमरे यांची निवड करण्यात आली आहे.
विविध आघाड्यांचे पदाधिकारी
युवा मोर्चा अध्यक्ष-सुनील पवार, महिला मोर्चा अध्यक्षा-जान्हवी यतीन कदम, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष-बाबाजी शिरसाठ, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष- बेनिलाल पाडवी, किसान मोर्चा अध्यक्ष- दिगंबर कवडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष- जलील अन्सारी, ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष- संदीप भुजबळ, आयटी सेल अध्यक्ष- सुहास शिंदे, सोशल मीडिया- संदीप मुरकुटे, प्रसिध्दिप्रमुख- संदीप शिरसाठ, एनजीओ अंत्योदय आघाडी- जयराम वाघ, कायदा सेल-वाल्मीक गायकवाड, वैद्यकीय सेल- अभय निकम, सहकार आघाडी -बापुसाहेब पाटील, मच्छिमार सेल- योगेश झिटे, प्रज्ञावंत आघाडी- नितीन पांडे, उद्योग आघाडी – सुनील देवरे, पूर्व सैनिक आघाडी- दादाजी आहेर, शिक्षक आघाडी- सुधाकर पगार, व्यापारी आघाडी- दत्तराज छाजेड, व्यापारी आघाडी- आशिष भंडारी, भटके-विमुक्त आघाडी- लक्ष्मण राठोड, अध्यात्म समन्वय आघाडी- निवृत्ती महाराज, ज्येष्ठ नागरिक – विलास ढोमसे, वाहतूक सेल-दिशांत देवरे, कामगार आघाडी- पंकज खताळ, दिव्यांग आघाडी- माधवराव वाघ, क्रीडा आघाडी- विलास मत्सागर, पर्यटन विकास मंच-आदेश सानप, बेटी बचाओ, बेटी पढाओ-परेश शहा आदींचा समावेश आहे.
हेही वाचा :