देवळा(जि. नाशिक) : केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी धनगर आरक्षणाला केलेल्या कथित विरोधाच्या निषेधार्थ तालुक्यातील भाजयु मोचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आढाव यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारात झोकून देऊन पक्षाच्या ध्येय धोरणेचा प्रचार व प्रसार केला. यात दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार व विद्यमान केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. त्या आज आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत. निवडणुकीच्या वेळी आम्ही समाजाने एक मताने मतदान केले. यासाठी समाजाच्या बैठका घेतल्या. आज आमचा समाज अतिशय हलाकीचे जीवन जगत असतांना आमच्या आरक्षणाला ना. डॉ भारती पवार या विरोध करत असल्याने आम्ही सर्व समाज बांधव त्यांचा निषेध व्यक्त करीत असून मी व्यक्तिशः भाजयुमोच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे तालूका अध्यक्ष योगेश ( नानू ) आहेर यांच्याकडे सुपूर्द केला असून, त्यांनी तो मंजूर करावा अशी विनंती केली आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीत मंत्री पवार यांना आमचा धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा राजीनामा पत्रात दिला आहे.
हेही वाचा :