milk file photo
नाशिक

Nashik milk -दूध भेसळ रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना निर्देश

सांख्यिकीय माहिती संकलनासह तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती सिन्नर यांच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिले आहेत.

पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वैरागी यांनी केलेल्या तक्रारीनुसार पंचायत समिती प्रशासनाने कार्यवाही केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार सार्वजनिक आरोग्य व अन्नसुरक्षा राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात दूध संकलन केंद्रे व डेअरीचालकांची नोंदणी व परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच दूध संकलन व वितरणाची सांख्यिकीय माहिती दर १० दिवसांनी (लिटरमध्ये) संकलित करून संबंधित विभागाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय संशयास्पद हालचाली आढळणाऱ्या किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या केंद्रचालकांविरुद्ध अहवाल तयार करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

'भेसळमुक्त गाव' संकल्पना राबविण्याचे आवाहन

दरम्यान, ग्रामसभांमध्ये दूध भेसळीबाबत जनजागृती करून 'भेसळमुक्त गाव' संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी या संदर्भात सर्व ग्रामपंचायतींना सूचना देत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • महत्त्वाचे निर्देश दूध संकलन व वितरणाची माहिती दर १० दिवसांनी सादर करणे बंधनकारक

  • सर्व संकलन केंद्रांची नोंदणी व परवान्यांची तपासणी

  • संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ अहवाल सादर

  • 'भेसळमुक्त गाव' संकल्पना राबविण्याचे आवाहन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT