नाशिक : प्रफुल्ल पवार
जिल्ह्यात रेशनकार्डची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याच्या मोहिमेला वेग आला असून, जिल्ह्यात २९ हजार ७७३ रेशनकार्डधारक यादीतून वगळण्यात आली आहेत. त्याचवेळी २५ हजार ७५३ नवीन रेशनकार्डधारकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देताना अपात्र व दुबार नोंदी कमी करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे दिसून येते.
वगळण्यात आलेल्या रेशनकार्डामध्ये प्राधान्य कुटुंबातील १८ हजार ५२७ कार्डे सर्वाधिक आहेत. त्यानंतर अंत्योदय योजनेतील ५ हजार ५०२, बिगरप्राधान्य गटातील ३ हजार ४४२ आणि दारिद्रयरेषेवरील २ हजार ३०२ कार्डे यादीतून कमी करण्यात आली आहेत. दरम्यान, नव्याने रेशनकार्ड देण्याच्या प्रक्रियेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील १९ हजार ३९, अंत्योदय योजनेतील ४ हजार ५३५, बिगरप्राधान्य गटातील १ हजार ७५८ आणि दारिद्रयरेषेवरील ४२१ लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. मे २०२६ ते १६ ऑगस्ट २०२६ या चार महिन्यांच्या या कालावधीत १६ हजार ४०५ नवीन रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत.
रेशनकार्ड यादीतून वगळण्याची कारणे
मृत लाभार्थी, दुबार नोंद, स्थलांतर, अपात्रता, पडताळणीत पात्रता निकष पूर्ण न होणे, नवविवाहित लाभार्थ्यांचे नाव कमी २०२६ या चार महिन्यांच्या या कालावधीत १६ हजार ४०५ नवीन रेशनकार्डे तयार करण्यात आली आहेत.
ज्या मुलींचे लग्न झाले आहे व जे नागरिक मयत झाले आहे अशा लाभार्थ्यांचा लाभ कमी करून नव्याने २५ हजारांहून अधिक नवीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू असेन.
- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक