Gold price | सोने-चांदी दरवाढीला अखेर ब्रेक..!

चारच दिवसांत सोने ८, तर चांदी १५ हजार रुपयांनी झाली स्वस्त
gold price
gold price
Published on
Updated on

नाशिक : सोन्या-चांदीच्या तेजीला सप्टेंबर महिना सुरू होताच ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे २ सप्टेंबरच्या सकाळी भारतीय सराफा बाजारात दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई, जळगावसह देशातील प्रमुख शहरांमध्ये मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्याने खरेदीदारांचे लक्ष बाजाराकडे वेधले गेले आहे. नाशिक बाजारात गेल्या आठवड्याच्या अखेरीसपासून सोन्याबरोबरच चांदीत देखील सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२८) नाशिकच्या बाजारात २४ कॅरेट सोने दर प्रतितोळा जीएसटीसह १ लाख ६४ हजार ८०० रुपये इतका नोंदविला गेला

२२ कॅरेट सोने प्रतितोळा १ लाख ५१ हजार ६१६ रुपये, तर चांदी प्रति किलो २ लाख ५४ हजार ४१० रुपये असा दर होता. त्यानंतर पुढील सलग चार दिवस सोने आणि चांदी दरात घसरण नोंदविले गेल्याने, बुधवारी (दि.२) २४ कॅरेट सोन्यात तब्बल ७हजार ७२५ रुपयांची घसरण झाली. तर २२ कॅरेट सोने ७ हजार १०७रुपयांनी स्वस्त झाले. चांदीतही मोठी घसरण झाली असून, चांदी मागील चारच दिवसांत तब्बल १५ हजार ४५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता, कच्च्या तेल, महागाईची भीती आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण नोंदविली जात आहे. पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सणासुदीत दिलासा

मागील काही दिवसांमध्ये सोने-चांदीचे दर गगनाला भिडल्याने, ग्राहकांकडून सोने-चांदी खरेदी करताना हात आखडता घेतला जात होता. या काळात गुंतवणूकदार सक्रिय असल्याने सराफा व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळत होता. आता दर कमी झाल्याने सोने-चांदी खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. आगामी सण-उत्सव लक्षात घेता, सोने-चांदीतील कमी होत असलेले दर ग्राहकांना दिलासा देणारे ठरणार आहेत

..असे आहेत नाशिकमधील दर (सर्व दर जीएसटीसह)

चांदी - प्रतिकिलो २ लाख

सोने २४ कॅरेट - प्रतितोळा १ लाख ५७ हजार ७५

सोने २२ कॅरेट - प्रतितोळा १ लाख ४४ हजार ५०९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news