नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र विधान १७परिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपावरून अद्यापही तिढा कायम आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात असली, तरी भाजपकडूनही या जागेवर दावा ठोकण्यात येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महायुतीच्या प्रारंभिक फॉर्म्युल्यानुसार भाजपला १२, शिवसेना शिंदे गटाला ३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना २ जागा देण्याचे निश्चित झाले होते. मात्र शिवसेनेने ७जागांची मागणी केल्याने जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही असून, पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, ही जागा न सोडल्यास भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये महायुतीक स्पष्ट बहुमत आहे.
भाजपकडे १८८, शिवसेना शिंदे गटाक १७१ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडे १०७ सदस् मिळून महायुतीकडे एकूण ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे महाविकास आघाडीचे संख्याबळ तुलनेने कमी असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ४५ आणि काँग्रेस १ सदस्यांसह आघाडीत आहेत. याशिवाय इस्लाम पार्टीचे ३७ एमआयएमचे २१ तसेच अपक्ष व इतर ३९ सदस्य आहेत.
तिरंगी लढतीची शक्यता
जागावाटपाचा तिढा लवकर न सुटल्यास नाशिकमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अपक्षांची भूमिका निर्णायक
भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढल्यास अपक्ष, उद्धव ठाकरे गट, एमआयएम तसेच इतर पक्षांच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संख्याबळावर नव्हे, तर राजकीय समीकरणांवरही अवलंबून राहणार आहे.