Maharashtra Tourism : विदेशी पर्यटकांची पहिली पसंत 'महा' राष्ट्रच !  File Photo
नाशिक

Maharashtra Tourism : विदेशी पर्यटकांची पहिली पसंत 'महा' राष्ट्रच !

वर्षभरात ३७ लाख परदेशी पर्यटकांची राज्यातील पर्यटनस्थळांना भेट. २०२३ च्या तुलनेत ४ लाखांची वाढ पर्यटनांतील वैविध्य, सेवा- सुविधांचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra is the first choice of foreign tourists!

नाशिक : निल कुलकर्णी

उद्योग, शिक्षण, विकासात अग्रणी असलेल्या महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. २०२४ मध्ये सुमारे ३७ लाख पर्यटकांनी राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत महाराष्ट्रच पर्यटनासाठी आग्रेसर असल्याची एक प्रकारे मोहर उमटवली आहे. २०२३ पेक्षा ही संख्या चार लाखांहून अधिक असल्याचे केंद्रीय पर्यटन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल राज्यसभेत माहिती दिली. त्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, चित्रपटनिर्मिती आदी प्रगतीचे आलेख गाठतानाच विदेशी पर्यटकांचे आवडते 'हॉट डेस्टिनेशन' महाराष्ट्रच असल्याचेही अधोरेखित झाले. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ३३ लाख ८७ हजार परदेशी पर्यटकांनी भेट दिली. हीच संख्या २०२४ मध्ये वाढून ३७ लाख ५ हजार १७० इतकी विक्रमी झाली झाले. केवळ बर्फाच्छादित शिखरे सोडली,

तर महाराष्ट्रात पर्यटनासाठी बहुविध पर्याय आणि वैविध्य उपलब्ध आहे. जंगल सफारी, जागतिक वारसा असलेल्या प्राचीन लेण्या, निळाशार समुद्र, रूपेरी वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटन, थंड हवेची ठिकाणे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या आणि युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा म्हणून समाविष्ट गड-किल्ल्यांसह पर्यटन विभागाकडून बॅण्डिंग होत असलेले हेमलकसा, भामरागड सारखी सामाजिक पर्यटनस्थळे इतके बहुविध पर्याय अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने विदेशी पर्यटकांनी देशात महाराष्ट्रातील स्थळांवर पसंतीची मोहर उमटवली आहे.

जीववैविध्याने समृद्ध जंगले, बर्ड सॅच्यूरी, निळेशार, रूपेरी समुद्रकिनारे, प्राचीन लेण्या, शिल्प, शिर्डी, पंढरपूर अशी धार्मिक स्थळे आणि नुकतेच युनेस्कोकडून शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक मानांकन मिळाल्याने राज्यात देशी विदेशी पर्यटक संख्येत वाढ होताना दिसत आहे. पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या रिसॉर्ट, हॉटेल्स, खाद्यपदार्थ आदींमध्येही राज्याने जागतिक 'स्टॅण्डर्ड' सेवा सुविधेत मानांकन मिळवले. त्यामुळेही विदेशी पर्यटक वाढले.
- वेदांत देशपांडे, पर्यटन अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर
66 मुंबई जागतिक नकाशावर सर्वाधिक लोकप्रिय व ख्यातकीर्त नगर आहे. मुंबईत येऊनच विदेशी पर्यटक देशभर फिरतो. विदेशी पर्यटक संख्या वाढवण्यात व्यावसायिक, व्यापारी कारणांसाठी येणाऱ्या पर्यटकांचा मोठा वाटा आहे. संतुलित हवामान, शांत, स्थिर वातावरण, पर्यटनातील वैविध्य, 'कनेक्टिव्हिटी', किल्ल्यांना मिळालेले जागतिक मानांकन यामुळे राज्यात विदेशी पर्यटक महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती देतात.
- कॅप्टन नीलेश गायकवाड, पर्यटन अभ्यासक. पुणे
महाराष्ट्र पर्यटन विभागाने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा कार्यान्वित केल्या. डिजिटल मार्केटिंग, नवतंत्रज्ञान माध्यमांचा यथार्थ उपयोग वाढला आहे. विदेशी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या 'एअरबीॲण्डबी' पोर्टलशी पर्यटन विभागाने नुकतेच 'टायअप' केल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या वाढली. हवाई, रेल्वे कनेक्टिव्हिटी, शांत स्थिर वातावरण यासह खासगी सेवा पुरवठादारही आंतरराष्ट्रीय स्टॅर्डर्डच्या सेवा यामुळे पर्यटकवृद्धी झाली.
- जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विभाग, नाशिक
राज्य सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांत याहून अधिक वाढ केल्यास कुंभमेळ्यात ३० पटीने अधिक विदेशी पर्यटक वाढतील, असा अंदाज आहे. नागरिकांनीही 'अतिथी देवो भव'नुसार उत्तम, प्रामाणिक व्यवहार, आदारातिथ्याचा आदर्श जोपासावा, स्वच्छ शहर उपक्रमात सहकार्य, नदी प्रद्यणमुक्तीसाठी जागर केल्यास आगामी कुंभमेळ्यात ४० कोटी पर्यटक नाशिकसह राज्यात येतील.
-दत्ता भालेराव, पर्यटन अभ्यासक, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT