FDI : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचीच मक्तेदारी; ४० टक्के गुंतवणुकीसह देशात भारी  File Photo
नाशिक

FDI : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचीच मक्तेदारी; ४० टक्के गुंतवणुकीसह देशात भारी

सिंगापूरमधून सर्वाधिक ओघ; राज्यात तब्बल १.६४ लाख कोटींची गुंतवणूक, कर्नाटक-गुजरातला टाकले मागे

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra has a monopoly in foreign investment; with 40 percent investment, it is the largest in the country

नाशिक : सतीश डोंगरे

देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून ओळखल्या जाणान्या महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल ४० टक्के वाटा एफट्या महाराष्ट्राने उचलला असून, राज्यात विक्रमी १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राने देशातील इतर सर्व राज्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

विशेष म्हणजे, या गुंतवणुकीत सिंगापूरने सिंहाचा वाटा उचलला आहे. सुरक्षित वातावरण, स्थिर सरकारी धोरणे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्र विदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ३२ टक्के असलेला राज्याचा वाटा यंदा ४० टक्क्यांवर पोहोचला असून, ही बाद राज्याच्या आर्थिक धोरणांचे यश अधोरेखित करते. सिंगापूरमधून २०२४-२५ मध्ये १४.१४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. २०२३-२४ मध्ये हा आकडा ११.७७ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. २०१७-१८ मध्ये भारतात मॉरिशसमधून सर्वाधिक विदेशी गुंतवणूक येत होती. मात्र, १८-१९ पासून सिंगापूरने मॉरिशसची जागा घेतली आहे.

भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रात युरोपियन देशांबरोबरच सिंगापुरमधून गुंतवणूक वाढण्यामागे कनेक्टिव्हिटी हे प्रमुख कारण आहे. भारत-सिंगापूर व्यापार करारामुळे गुंतवणुकीला मोठी चालना मिळत असून, त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होत आहे.
संजय सोनवणे, उपाध्यक्ष माहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
आम्नेय आशियामध्ये सिंगापूर हे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि तिथे मोठ्या संख्येने भारतीय उद्योजक स्थायिक आहेत. त्यामुळे सिगापूरमधील कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास नेहमीच उत्सुक असतात. केंद्र आणि राज्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे हा गुंतवणुकीचा ओष सातत्याने वाढत आहे.
धनंजय बेळे, माती अस्पता, निमा

आम्नेय आशियामध्ये सिंगापूर हे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि तिथे मोठ्या संख्येने भारतीय उद्योजक स्थायिक आहेत. त्यामुळे सिगापूरमधील कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास नेहमीच उत्सुक असतात. केंद्र आणि राज्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे हा गुंतवणुकीचा ओष सातत्याने वाढत आहे. - धनंजय बेळे, माती अस्पता, निमा

  • महाराष्ट्र 1,64,875 कोटी

  • कर्नाटक 56,030 कोटी

  • दिल्ली 51,540 कोटी

  • गुजरात 47,947 कोटी

  • तामिळनाडू 31,103 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT