महामुंबईत परवडणाऱ्या घरांच्या किमती 17 टक्क्यांनी वाढल्या pudhari photo
नाशिक

Nashik Real Estate | परवडणाऱ्या घरांच्या शहरात आता 'लक्झरी'चा झगमगाट; दसऱ्याला नाशिकमध्ये कोटींच्या फ्लॅटची खरेदी

Nashik Real Estate | दसरीला 10 कोटींच्या फ्लॅटपर्यंत व्यवहार; 1 कोटींचे 15, तर 2 कोटींचे 12 फ्लॅट बुक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे
परवडणाऱ्या घरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात आता आलिशान जीवनशैलीचा नवा अध्याय लिहिला जात आहे. एकेकाळी मध्यमवर्गीयांसाठी घरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता कोटीवधी रुपये किमतीच्या लक्झरियस फ्लॅटची क्रेझ वाढत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात तब्बल ३० आलिशान फ्लॅटची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एक कोटीचे १५, दोन कोटींचे १२, तर आठ ते दहा कोटी रुपये किमतीच्या तीन फ्लॅटचा समावेश आहे. शहरातील आलिशान घरांच्या बाजारपेठेतील ही उलाढाल नाशिकच्या बदलत्या आर्थिक स्थितीचे आणि वाढत्या गृहखरेदीच्या आकांक्षांचे संकेत देणारी ठरत आहे.

नाशिकमध्ये सध्या एक कोटी रुपयांपासून ते तब्बल १० कोटी रुपयांपर्यंत किमतीचे आलिशान फ्लॅट उपलब्ध आहेत. गंगापूर रोड परिसरात या महागड्या घरांची संख्या अधिक असून, शहरातील उच्च्रू वस्ती म्हणून या भागाची ओळख आहे.

प्रशस्त सदनिका, आकर्षक अंतर्गत सजावट, आधुनिक बांधकाम, अत्याधुनिक सुविधा आणि प्रतिष्ठित परिसर यामुळे या घराकडे उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांचा कल वाढत आहे. दसरा हा नवीन वस्तू, सोने आणि वाहनांच्या खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. याच मुहूर्तावर घरखरेदीलाही प्राधान्य दिले जाते.

यंदा नाशिकमध्ये आलिशान सदनिकांच्या विक्रीने विशेष लक्ष वेधले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्री झालेल्या ३० लक्झरियस फ्लॅटपैकी निम्मे म्हणजेच १५ फ्लॅट एक कोटी रुपये किमतीचे आहेत. दोन कोटी रुपये किमतीचे १२ फ्लॅट विकले गेले असून, आठ ते दहा कोटी रुपये किमतीचे तीन फ्लॅटचीही विक्री झाली आहे.

"दसराच्या मुहूर्तावर २५ ते ३० लक्झरियस फ्लॅटची विक्री झाल्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये एक कोटीपासून ते १० कोटींपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध आहेत. विशेषतः गंगापूर रोड परिसरात हे फ्लॅट असून, त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- शांतू देशपांडे, अध्यक्ष, क्रेडाई.

गंगापूर रोड होतोय आलिशान घरांचे केंद्र

गंगापूर रोड परिसराने नाशिकच्या उच्च्रू निवासी भागामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शहरातील प्रमुख सुविधा, विकसित होत असलेली नागरी वस्ती, प्रतिष्ठित निवासी प्रकल्प आणि आलिशान जीवनशैलीला पूरक वातावरण यामुळे या भागाला पसंती मिळत आहे. याच परिसरात एक कोटीपासून कोटीवधी रुपयांपर्यंतच्याड्या उपलब्ध होत असून, लक्झरियस गृहप्रकल्पांची संख्या वाढताना दिसत आहे. या सदनिकांमध्ये अत्याधुनिक अंतर्गत सजावट, प्रशस्त खोल्या, आधुनिक जीवनशैलीला पूरक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.

नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी ओळख

आठ ते १० कोटी रुपये किमतीच्या तीन सदनिकांची विक्री झाल्याची बाब विशेष उल्लेखनीय आहे. या व्यवहारांमुळे नाशिकमध्ये उच्च मूल्याच्या निवासी मालमत्तांनाही ग्राहक मिळत असल्याचे स्पष्ट होते. एक कोटी आणि दोन कोटी रुपयांच्या सदनिकांच्या विक्रीनेही बाजारपेठेचा विस्तार अधोरेखित केला आहे. नाशिकची औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी क्षेत्रातील वाढ, बदलत्या जीवनशैलीच्या अपेक्षा आणि आधुनिक निवासी प्रकल्पांची उपलब्धता या पार्श्वभूमीवर आलिशान घरांचा पर्याय अधिक ठळक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT