संग्रहित 
नाशिक

Loudspeaker Rules | दुर्गाष्टमीला रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपकांना परवानगी

Loudspeaker Rules | नाशिक शहरापुरता आदेशात बदल; कोजागरी पौर्णिमेची परवानगी रद्द

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुर्गाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नवरात्रोत्सव मंडळांना दिलासा देत ध्वनििक्षेपक व ध्वनिर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने रविवारी (दि. १८) रात्री १२ पर्यंत परवानगी दिली. मात्र यासंदर्भातील पूर्वीच्या आदेशात सुधारणा करतानाच येत्या २५ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त नाशिक शहरास देण्यात आलेली ध्वनििक्षेपक वापरachi परवानगी रद्द करण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी रविवारी (दि. १८) हा सुधारित आदेश जारी केला. स्थानिक परिस्थिती, लोकप्रतिनिधींचे अभिप्राय तसेच जिल्हाधिकारी आणि नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी १९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार दि. १९, २० आणि २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत ध्वनििक्षेपक वापरण्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुर्गाष्टमीच्या पार्श्वभूमीवर ऐन वेळी नाशिक शहरासाठी रविवारी (दि. १८) रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील परवानगी कायम

शहरातील २५ ऑक्टोबरची परवानगी रद्द करण्यात आली असली, तरी नाशिक ग्रामीण हद्दीसाठी पूर्वचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दि. १९, २० आणि २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत ध्वनििक्षेपक वापरण्याची परवानगी लागू राहणार आहे. ध्वनििक्षेपक वापराबाबतच्या आदेशातील अन्य अटी व शर्ती कायम असून, निर्धारित ध्वनी मर्यादाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT